नाशकात अवकाळीचा तडाका ; विजांच्या कडकडाटासह पाऊस, शेतक-यांवर संकट | पुढारी

नाशकात अवकाळीचा तडाका ; विजांच्या कडकडाटासह पाऊस, शेतक-यांवर संकट

नाशिक पुढारी ऑनलाइऩ डेस्क 

नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळीने झोडपून काढले आहे. अवकाळीच्या तडाक्याने बळीराजा धास्तावला असून अनेक ठिकाणी द्राक्षबागांसह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिक शहरातही बुधवारी पहाटे पावसाने हजेरी लावली.

निफाड तालुक्यातील उत्तर भागात शिवडी, उगांव, सारोळे, खडकमाळेगांव, सोनेवाडी खुर्द, खेडे वनसगांव, नांदुर्डी या परिसरात बुधवारी पहाटे वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली आहे. आज बुधवार पहाटे 4 पासून येवला शहर व परिसरातील भागात विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. दिंडोरीतही शेतकरी संकटात सापडला आहे, द्राक्षबागा उद्धस्त झाल्या आहेत.

अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतात सुकविण्यासाठी पसरविलेल्या बेदाणा पाऊसाने भिजला आहे. उन्हाळ कांद्याच्या पाती खराब होण्याचा धोका वाढला आहे. कागद लावलेल्या द्राक्षघडांना कागद चिकटून राहिल्यास बुरशी पकडण्याचा धोका निर्माण झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंताक्रांत आहे. परिपक्व मण्यांना या पाऊसाच्या थेंबानी तडे जाण्याचा धोका असून पहाटेपासून जिल्ह्यातील विविध भागात गडद ढगाळ हवामान आहे. वीजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु असून सर्व शेतकरी चिंतातुर आहेत.

हेही वाचा :

Back to top button