सांगली : निगडी खुर्द खूनप्रकरणी मुख्य आरोपीस अटक; जत पोलिसांची कारवाई | पुढारी

सांगली : निगडी खुर्द खूनप्रकरणी मुख्य आरोपीस अटक; जत पोलिसांची कारवाई

जत; पुढारी वृत्तसेवा : निगडी खुर्द (ता. जत) येथे शेतात टेम्पो का घातला? याचा जाब विचारल्याने तुकाराम शिवाजी ताटे (वय. ३४) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना २३ जुलै २०२१ रोजी घडली होती. या प्रकरणी चौघा संशयितांनावर गुन्हा दाखल झाला होता. यातील तिघांना अटक करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी विजय कराळे फरारी होता.

निगडी खुर्द : सात महिन्यानंतर आरोपी अटक

अनेक महिने कराळे पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सात महिन्यानंतर मुख्य आरोपी विजय कराळे यास पुणे येथून सोमवारी पहाटे अटक केली आहे. तसेच मयत तुकाराम ताटे यांची MH.10.CA.7691 या क्रमांकाची चारचाकी गाडी पळवून नेली होती. ही चारचाकी गाडी  पोलिसांनी जप्त केली आहे.

हा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक उदय डबल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. जत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आगतराव मासाळ, योगेश पाटोळे यांनी पुणे येथे एका ठिकाणी कराळे हा लपून राहिला असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार त्या ठिकाणी छापा टाकून संशयित मुख्य आरोपी विजय कराळे यास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का?

 

 

Back to top button