दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडितप्रकरणी चौकशीचे आदेश : ऊर्जामंत्री नितीन राऊत | पुढारी

दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडितप्रकरणी चौकशीचे आदेश : ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा :

मुलुंड – ट्रॉम्बे या BARC च्या कॅम्पसमध्ये जंगलातील आगीमुळे दक्षिण मुंबईत वीज पुरवठा बंद झाला होता. यानंतर राज्यभार प्रेषण केंद्र नियंत्रणाकरिता टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

या बंदचा परिणाम ट्रॉम्बे – साल्सेट ह्या वाहिनीवर झाला. त्‍यामूळे ही वाहिनी ओव्हरलोड होऊन बंद पडली. ज्यामुळे ट्रॉम्बे निर्मिती केंद्रावर अतिरिक्त भार येऊन वीज निर्मिती संच बंद पडले. याचा परिणाम  दक्षिण मुंबई ( कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर ) परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. आगीमुळे झालेला हा बिघाड अवघ्या ७० मिनिटात दुरुस्त करून दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आली.  तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल, असेही डॉ. नितीन राऊत म्‍हणाले.

या ठिकाणी वीज पुरवठा खंडित

दक्षिण मुंबईसाठी ट्रॉम्बे ह्या मुख्य ग्रहण केंद्रामधून २२० kV कळवा, मुलुंड, सोनखर, चेंबूर, साल्सेट, साल्सेट २, चेंबूर १ आणि 2 ह्या वाहिन्यांद्वारे विद्युत पुरवठा बंद  होता. तसेच भार नियंत्रणाकरिता नेरुळ – चेंबूर आणि सोनखर वाहिन्या एकत्र जोडल्या होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठी नियोजित कामाकरिता बंद केल्‍या होत्या.

पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

ट्रॉम्बे – साल्सेट वाहिनी पूर्ववत केल्यानंतर दक्षिण मुंबई मधील विद्युत पुरवठा कर्नाक, बॅकबे, परेल आणि महालक्ष्मी येथे पूर्ववत करण्यात आला.
तसेच महापारेषणच्या नेरुळ – चेंबूर, कळवा, सोनखर, ह्या वाहिन्या पूर्ववत करण्यात आल्या. तसेच मुलुंड वाहिनीच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम BARC परिसरात चालू आहे.

हेही वाचा  

Back to top button