सांगली : पुढारी वृत्तसेवा
शुभश्री लॉनमुळे सांगलीच्या वैभवात भर पडणार आहे. सांगलीकरांची चांगली सोय होणार आहे, असे प्रतिपादन दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी येथे व्यक्त केले.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत जाधव यांनी जुन्या बुधगाव रोडवर हे भव्य लॉन सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी एका शानदार सोहळ्यात दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमती शांतादेवी जाधव, डॉ. अभय शिर्के, बांधकाम व्यावसायिक रणजितसिंह मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोनशिलेचे अनावरण करून लॉनचे उद्घाटन केले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी या लॉनमध्ये केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. अतिशय देखण्या, शांत परिसर व सर्व सुविधांनीयुक्त असलेल्या या भव्य लॉनमुळे सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील लोकांची चांगली सोय होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमास शुभांगी जाधव, सौ. हेमा शिर्के, अॅड. प्रमोद जाधव, अॅड. प्रकाश जाधव, दिलीपराव जाधव, नीलम मोहिते, इंद्रजित मोहिते, चारुता शिर्के, अक्षय शिर्के, अॅड. वसंतराव मोहिते, डॉ. महेश शहा, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे. के.(बापू) जाधव, अॅड. सर्वश्री नरेंद्र लांडे, अशोक वाघमोडे, आर. आर. पाटील, प्रताप हारूगडे, सुरेश भोसले, प्रदीप पोळ, प्रदीप जाधव, चंद्रकांत माळी, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, सुनील पालकर, वैभव कदम, महेश साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पाही व्हिडिओ :"दैनिक पुढारी"चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दादा उंडाळकर पुरस्कार