आष्टा : पुढारी वृत्तसेवा
कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर यांच्यावतीने येथील उपबाजार आवारातील हळद मार्केटमध्ये चालू हंगामातील हळदीच्या सौद्यांचा प्रारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. येथील रमेश हणमंत जाधव (आष्टा, नायकवडी मळा) यांच्या हळदीस 21000 इतका उच्चांकी दर मिळाला.
आमदार नाईक यांनी बाजार समिती व हळद उत्पादक शेतकरी यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. बाजार समितीचे उपसभापती दिलीप कदम यांनी स्वागत केले. सभापती संदीप पाटील यांनी येथील हळद मार्केटच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय पाटील, वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, दिलीप वग्याणी, बबन थोटे, माजी नगराध्यक्षा स्नेहा माळी, नगरसेवक विजय मोरे उपस्थित होते.संचालक अल्लाउद्दीन चौगुले यांनी आभार मानले.
यावेळी झालेल्या सौद्यात एक नंबर हळदीला 11000 ते 22000 रूपये , दोन नंबरच्या हळदीला 9500 ते 10500 रूपये, गट्टा हळदीला 9500 ते 9900 रूपये, कणी हळदीला 7800 ते 8800 रूपये, चोरा हळदीला 22000 ते 25000 रुपये असा दर मिळाला.
आष्टा : येथील उपबाजार आवारात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते हळदीच्या सौद्यांचा प्रारंभ झाला. यावेळी वैभव शिंदे उपस्थित होते.
हेही वाचलतं का?