विटा : मायणी रस्त्यावरील अपघातात बीडचा ऊसतोडणी मजूर ठार | पुढारी

विटा : मायणी रस्त्यावरील अपघातात बीडचा ऊसतोडणी मजूर ठार

विटा, पुढारी वृत्तसेवा :  विटा मायणी रस्त्यावर नागेवाडी जवळ अज्ञात वाहन ठोकरल्याने झालेल्या अपघातात ऊस तोडणी मजूर जागीच ठार झाला. रावसाहेब ज्ञानदेव दराडे (वय ५५) असे मृताचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील दराडेवाडी (ता.केज) येथील आहे. हा अपघात रात्री पावणे आठच्या सुमारास घडला. याबाबत विटा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार मजूर खानापूर तालुक्यात उसतोडीसाठी आले आहेत. यांतील रावसाहेब दराडे हे विट्याहून माहुलीकडे होंडा शाईन गाडीने (क्रमांक एम.एच.४४एम ५६२४) नागेवाडी मार्गे विटा ते मायणी रस्त्यावरून जात होते. गाडी नागेवाडी गावाच्या पुढे चिखलहोळ फाट्याच्या अलीकडे असलेल्या वळणावर अज्ञात वाहनाने धडक बसली असावी आणि यांत दराडे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी दराडे आणि त्यांची गाडी डावीकडे पडली होती.त्यांच्या डोक्याला, पोटाला जबर मार लागला आहे. शिवाय त्यांचा पायही तुटलेला आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पोलीस सहाय्यक निरिक्षक ए.पी. कन्हेरे अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button