Belgaum : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांची ४७ दिवसांनी सुटका | पुढारी

Belgaum : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांची ४७ दिवसांनी सुटका

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बंगळूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करणारे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 35 जणांना गुन्ह्यात जामीन मिळाला. त्यानंतर तब्बल 47 दिवसांनी त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. (Belgaum)

17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीला कारणीभूत ठरवत 35 मराठी युवक आणि नेत्यांना पोलिसांनी रातोरात अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले. त्यांच्यावर राजद्रोह, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल होते.

Belgaum : मराठी नेते आणि कार्यकर्त्यांची हिंडलगा न्यायालयासमोर मोठ्या संख्येने गर्दी

35 जणांवर कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळत नव्हता. गुरुवारी सहावे जिल्हा सत्र न्यायाधीश विनय कुंदापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी मराठी नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंडलगा न्यायालयासमोर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

त्यामुळे संध्याकाळ पाचपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. लोकांना एकत्र थांबायला मज्जाव करण्यात आला. बॅरिकेड्स लावून मुख्य प्रवेशव्दार अडवण्यात आले होते. साडेसात वाजता पहिल्यांदा रमाकांत कोंडुसकर यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर साडेआठ वाजता उर्वरीत 34 जणांना सोडण्यात आले. कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. डीसीपी रवींद्र गडादी कारागृहासमोर थांबून होते.

रमाकांत कोंडुसकर यांच्यासह भरत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक सुतार, सुनील लोहार, रोहित माळगी, विनायक सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बराळे.

लोकनाथ उर्फ लोकेश रजपूत, महेश मुतकेकर, नागेश काशिलकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ सिद्धार्थ गेंजी, गणेश यळ्ळूरकर, विकी उर्फ विल्‍लो मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राजू गुरव, हरिश मुतकेकर, बागेश नंद्याळकर, ऋतिक पाटील, अभिषेक पुजेरी, राजेंद्र बैलूर, श्रेयस उर्फ सोनू खटावकर, शशिकांत आरकेरी, शुभम ठाकूर, प्रशांत चव्हाण, विश्‍वनाथ गोटाडकी यांची जामीनावर मुक्तता झाली.

मराठी नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. नागरत्ना पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर, अ‍ॅड. एस. बी. पट्टण, अ‍ॅड. शंकर बाळनाईक, अ‍ॅड. चिदंबर होनगेकर, अ‍ॅड. विशाल चौगुले आणि अ‍ॅड. विकास तेरदाळकर यांनी काम पाहिले.

पोलिसांची दडपशाही

हिंडलगा कारागृहासमोर संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच मराठी कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त होता. मुख्य प्रवेशव्दार बॅरिकेडस लावून बंद केले तरी रस्त्याशेजारीही कार्यकर्त्यांना थांबण्यास मज्जाव करण्यात आला. कारागृहातून बाहेर येणार्‍या मराठी नेत्यांना भेटण्यासही देण्यात येत नव्हते. पोलिसांच्या या कृतीमुळे संताप व्यक्त होत होता.

Back to top button