इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार : तरुणाला पोलिस कोठडी

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार : तरुणाला पोलिस कोठडी

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अनिकेत प्रवीण वाडकर (वय 21, रा. हनुमाननगर) याला इस्लामपूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अत्याचारानंतर ती मुलगी सात महिन्याची गर्भवती होती.

अधिक वाचा : 

त्या मुलीला काही दिवसांपूर्वी एका शहरातील स्वयंसेवी संस्थेमध्ये पाठविले होते. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला तेथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती मुलगी 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे उपचारादरम्यान निष्पन्न झाले होते. गर्भातील अर्भक मृत झाल्याने तिचा गर्भपात करण्यात आला.

दरम्यान, एका महिला सामाजिक कार्यकर्तीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संशयित तरुणाने पीडित मुलीच्या अज्ञान व भोळेपणाचा फायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला.

हा प्रकार आई-वडिलांना सांगेन, अशी धमकीही संशयिताने पीडित मुलीला दिली असे फिर्यादीत म्हटले होते.

तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला होता.

इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करून येथील हनुमाननगर येथील संशयित अनिकेत याला अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news