मिरजेत बेकायदा दारू जप्त वीस लाखांची दारू असल्याचे स्पष्ट

मिरजेत बेकायदा दारू जप्त वीस लाखांची दारू असल्याचे स्पष्ट

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथे सुमारे वीस लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची आणि राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेली दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिरज येथे ही कारवाई केली.

दारूसह सुमारे 27 लाख 61 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या बेकायदा दारू विक्री प्रकरणी चालक गणेश महादेव पिंगळे (वय 25, रा. गवंडी गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर ) याला पथकाने अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथे बेकायदा दारू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणली होती.

पथकाने मिरज एस.टी. स्थानकाजवळ छापा टाकला. त्या छाप्यामध्ये ही दारू असलेला एक सहा चाकी टेम्पो (एम.एच. 13 आर 3919) पकडण्यात आला. त्यामध्ये गोवा बनावटीचे व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याचे 298 बॉक्स जप्त करण्यात आले.

या दारूची किंमत सुमारे वीस लाख रुपये आहे.

टेेम्पो सह दारू जप्त करण्यात आला. त्याची किंमत 27 लाख 61 हजार रुपये आहे.

या प्रकरणी गणेश पिंगळे या संशयितास अटक करण्यात आली. हा टेम्पो गोवा येथून दारू घेऊन उस्मानाबाद निघाला होता.

मिरज येथून तो जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करून तो पकडला.

बेकायदा दारू विक्री किंवा वाहतुकीची माहिती उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक देशमुख यांनी केले आहे.

मालकास ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना

बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी चालकास अटक झाली आहे.

मात्र, मालक अद्याप मिळालेला नाही. तो फरार झाला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची पथके बीड, उस्मानाबादला गेली आहेत.

बेकायदा दारू खरेदी आणि वाहतूक याप्रकरणी त्याच्याविरोधात या पूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news