

Educational Science Events
महाड : प्रतिवर्षी शून्य सावली दिवसाचे महत्व अधोरेखित झाले आहे नैसर्गिक वैज्ञानिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून ही महत्त्वाची पटना असून आपल्याकडे १६ मे व २७ जुलै २०२५ या दोन दिवशी या दिवसाची अनुभूती येणार आहे अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉक्टर समीर बुटाला यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
या दिवशी सूर्य पृथ्वीवरील काही विशिष्ट ठिकाणांवर अगदी डोक्यावर म्हणजेच झेनित पोझिशन वर असतो त्यामुळे त्यावेळी उभ्या वस्तूची सावली घेट त्याच्या पायाखाली पडते किंवा पूर्णतः अदृश्य होते, यामुळे आपल्याला कोणतीही उभी सावली दिसत नाही.
हा दिवस का पडतो? यासंदर्भात स्पष्टीकरण देताना डॉक्टर बुटाला यांनी सांगितले की पृथ्वीचा झुकलेला अक्ष हा महत्त्वाचा घटक आहे पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ओ झुकलेला आहे व याच झुकाव्यामुळे सूर्याच्या किरणांचा कोन ऋतू नुसार व अक्षांशानुसार बदलतो. सूर्य दरवर्षी मकरवृत्त २३.५ दक्षिण अक्षांश ते कर्कवृत्त २३.५ उत्तर अक्षांश या पट्टधामध्ये हालचाल करीत असतो, या दोन वक्रांच्या दरम्यान येणाऱ्या क्षेत्राला उष्ण कटिबंध म्हणतात. भारतातील बहुतांश भाग या पट्ट्यात येतात म्हणूनच येथे शून्य सावली दिवस अनुभवता येतो. जेव्हा सूर्य एखाद्या विशिष्ट अक्षांशावर असतो व त्या ठिकाणच्या लोकांसाठी तो अगदी डोक्यावरून पडतो तेव्हा सूर्यकिरण जमिनीवर ९०ओ कोनास पडतात अशावेळी कोणत्याही उभ्या वस्तूची सावली तिच्याच पायाखाली पडते आणि आपणास कोणतीही बाह्य सावली दिसत नाही, हा क्षण म्हणजेच शून्य सावली दिवस असे त्यांनी सांगीतले.
या घटनेचा अनुभव व फक्त कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन रेषांमधील प्रदेशांमध्येच घेतला जाऊ शकतो कारण सूर्य याच पट्ट्यात झेनित पोझिशन गाठतो. भारतामध्ये पुणे, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई यासारख्या शहरातून वर्षातून दोन वेळा एकदा एप्रिल- मे दरम्यान जेव्हा सूर्य उत्तराभिमुख असतो आणि एकदा ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान जेव्हा सूर्य दक्षिण भिमुख असतो शून्य सावली दिवस येतो. उदाहरणार्थ एखाद्या शहराचा अक्षांश जर १३ उत्तर असेल तर सूर्य त्या अक्षांशावर असलेल्या दिवशी तेथे शून्य सावली दिवस हातो.
शुन्य सावली दिवस शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे, विद्याध्यर्थ्यांना त्यामुळे - खगोलशास्त्रीय निरीक्षणाची सवय लागते.सावली आधारित गणिती प्रयोग, सूर्याचा स्थानिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे भौगोलिक ज्ञानाची आकलन शक्ती वाढते असे डॉक्टर बुटाला यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील महाड सारख्या ठिकाणी २०२५ यावर्षी शून्य सावली दिवस अनुक्रमे १६ में व २७ जुलै रोजी असणार आहे. या दिवशी दुपारी साडेबारा वाजता सूर्य चेट डोक्यावर येईल त्यामुळे त्या क्षणी उभ्या वस्तूची सावली केवळ त्याच्या पायाखाली पडेल किंवा पूर्णतः नाहीशी होईल, शून्य सावली दिवसाचे निरीक्षण करणे सोपे आहे असे स्पष्ट करून डॉक्टर बुटाला यांनी सांगितले की दुपारी साडेबारा वाजता एखादी सरळ उभी वस्तू जसे की काठी किंवा बाटली सपाट जमिनीवर ठेवा जर या वस्तूची सावलीनिहाय पायाखाली किंवा अरश्य झालेली दिसली तर तो शून्य सावलीचा क्षण आहे, मात्र ही घटना काही मिनिटासाठीच असते त्यामुळे निरीक्षणासाठी अचूक वेळ महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.
शून्य सावली दिवस ही नैसर्गिक वैज्ञानिक आणि शैक्षणिक दृष्टीने फार महत्वाची घटना असून जी आपल्याला सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधाची माहिती देते असे डॉ. समीर बुटाला यांनी स्पष्ट केले.
शून्य सावली दिवस ही नैसर्गिक वैज्ञानिक आणि शैक्षणिक दृष्टीने फार महत्वाची घटना असून जी आपल्याला सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधाची माहिती देते असे डॉ. समीर बुटाला यांनी स्पष्ट केले आहे.