Raigad News | पारमाची पुनर्वसनासाठी 19 कोटींचा निधी

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन, तीस वर्षानंतर मिळाला न्याय
वरंध, रायगड
रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवथर परिसरात त्यांच्या पुनर्वसित गावातील घरांचे भूमिपूजन करण्यात आले.Pudhari News Network
Published on
Updated on

वरंध (रायगड) : तीस वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील पहिल्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या व दरड कोसळण्याच्या घटनेमधील पारमाची गावातील 13 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

Summary

ग्रामस्थांनी सलग तीन दशके आपल्या पुनर्वसनासाठी केलेल्या सातत्याने सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून शनिवारी (दि.5) रोजी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवथर परिसरात त्यांच्या पुनर्वसित गावातील घरांचे भूमिपूजन करण्यात आले.या पुनर्वसनासाठी सरकारने 19 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची घोषणा गोगावले यांनी यावेळी केली.

28 जून 1994 रोजी महाड तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. महाड तालुक्यातील पारामाची गावावरती दरड कोसळली आणि यामध्ये तेरा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आज या घटनेला जवळपास 30 वर्ष पूर्ण झाली आणि हे गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले.

या घटनेला 30 वर्ष पूर्ण होऊन देखील या गावचा पुनर्वसन झालं नव्हतं मात्र भरत शेठ गोगावले यांनी तेव्हापासून आतापर्यंत या घटनेचा पाठपुरावा केला आणि आता या गावाला पुनर्वसनासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. गोगावले यांच्या हस्ते या परमाची गाव आणि पारमाची बौद्धवाडी यांच्या पुनर्वसनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले,

यावेळी वारकरी संप्रदायाचे ह भ प फणसे बाबा, माजी जि.प. सदस्या सुषमाताई गोगावले , सीईटीपी चेअरमन अशोक तलाठी, शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक विजय आप्पा सावत, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, विधानसभा संपर्कप्रमुख राजेश देशमुख, शिवसेना महाड तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर , माजी सभापती सपना ताई मालुसरे, वरंध विभाग संपर्कप्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीस वर्षानंतर अखेर पारामाची गावाला पुनर्वसन मिळणार

ज्यावेळी मी अपक्ष पंचायत समितीचा सदस्य असताना ही घटना घडली कोणताही विचार न करता त्यावेळी जेवढी मदत करता येईल ती आमच्या पद्धतीने केली मात्र आम्ही कुठेही कमी पडलो नाही आज पर्यंत आम्ही या गावच्या पुनर्विसनासाठी प्रयत्न करत राहिलो आता या प्रयत्नांना यश आले आहे, त्याचा फायदा गावच्या नागरिकांनी एकमेकांचे पाय न ओढता करून घ्यावे असा सल्ला दिला आहे निवडणुकीमध्ये आम्हाला काही मत कमी पडली असली तरी आम्ही त्याचा विचार करत नाही उलट पक्षी आम्हाला चार मते कमी द्या मात्र आपल्या गावचा विकास करून घ्या कारण आपल्या हाताच एक बोट कापल तर दुसर्‍या बोटाला कळ येते ती दुसर्‍याच्या हाताला जात नाही आमचं नात या गावशी असच आहे निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या ग्रामस्थांना हा एक प्रकारचा सल्ला नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे तीस वर्षानंतर का होईना अखेर पारामाची गावाला पुनर्वसन मिळणार हे आता निश्चित झाला आहे आणि तीस वर्ष पावसाळ्यात जीव मुठीत धरून वावरणार्‍या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पंधरा कोटी सोयीसुविधांसाठी

भरत गोगावले यांनी तीस वर्षांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेला उजाळा दिला. तेव्हापासूनच आपण या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून ग्रामस्थांनी देखील पुनर्वसनासाठी पाठपुरावा करत प्रचंड मेहनत घेतली आहे. शासनाने जरी 19 कोटी रुपये दिले असले तरी यातील पंधरा कोटी सोयी सुविधांसाठी मंजूर झाले आहेत तर अडीच कोटी रुपये हे घरे बांधण्यासाठी दिले आहेत. यामध्ये घर बांधून होणार नाहीत, मात्र आपण सीएसआर च्या मार्फत या ठिकाणच्या नागरिकांना लवकरात लवकर कशी घरी बांधून मिळतील या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news