Jellyfish found in Raigad | मुरुड समुद्र किनार्‍यावर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’चा वावर

आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक; पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता
मुरुड जंजिरा (रायगड)
मुरुड जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ या निळसर रंगाची जेलीफिश आढळली आहे.(छाया : सुधीर नाझरे )
Published on
Updated on

मुरुड जंजिरा (रायगड) : सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ या निळसर रंगाच्या आकर्षक परंतु संवेदनशील समुद्री जीवामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली, तरी या जीवाशी संपर्क साधणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड मधील प्राणिशास्त्र विभागामार्फत या ‘ब्लू बटन जेलीफिश’ विषयी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.

आकर्षक जेलीफिश पण तितकाच धोकादायक

ब्लू बटन जेलीफिशचे वैज्ञानिक नाव पोरपीटा पोरपीटा असे आहे. हा खरा जेलीफिश नसून, हायड्रॉझोअन पॉलिप्सच्या वसाहतींचा समूह प्रकारातील आहे. याचा आकार साधारण 2-3 सें.मी. व्यासाचा तर निळसर रंगाचा, पारदर्शक पिशवीसारखा दिसतो. याचे वास्तव्य उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय समुद्रातील पृष्ठभागावर तरंगतो. हा जेलीफिश आकर्षक दिसतो, पण स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज, सूज, जळजळ आणि चट्टे निर्माण होतात. पर्यटकांनी सुरक्षितता म्हणून किनार्‍यावर फेरफटका मारताना अशा जेलीफिशपासून सुरक्षित अंतर ठेवावे. चुकून संपर्क झाल्यास, प्रभावित भाग समुद्राच्या पाण्याने ताबडतोब धुवावा.

सावधगिरी आणि जागरूकता बाळगणे अत्यावश्यक

पावसाळ्यात समुद्रकिनार्‍यावरील जैवविविधता अनुभवण्याची संधी मिळते, मात्र त्याचबरोबर काही जीव, जसे की ब्लू बटन जेलीफिश, यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी आणि जागरूकता बाळगणे अत्यावश्यक आहे असे आवाहन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड मधील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. जावेद खान, प्रा. अल्ताफ फकीर व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले आहे.

अशा प्रकारे आपली सुरक्षितता बाळगा

  • किनार्‍यावर फेरफटका मारताना अशा जेलीफिशपासून सुरक्षित अंतर ठेवा.

  • चुकून संपर्क झाल्यास, प्रभावित भाग समुद्राच्या पाण्याने ताबडतोब धुवावा.

  • बर्फाचा शेक द्या आणि लक्षणे तीव्र असतील तर तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या.

  • मुले आणि पर्यटकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी, कारण हे जीव फारच आकर्षक वाटतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news