

रायगड – पुढारी वृत्तसेवा : ताम्हिणी घाटात पुणे माणगांव रोडवर आज सकाळी सातच्या सुमारास ट्रकचा झाडाला धडकून अपघात झाला. माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कोंडेथर येथे वाहन क्रमांक MH 12 LT 4599 हा ट्रक पुणे वरून माणगांव कडे येत असताना ब्रेक फेल झाल्याने ही दूर्घटना घडली.
अपघातानंतर तिघेजण ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू टीम व स्टाफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा :