Mohan Bhagwat : समलैंगिक समुदायाच्या ‘प्रायव्हसी’चा आदर केला पाहिजे : मोहन भागवत | पुढारी

Mohan Bhagwat : समलैंगिक समुदायाच्या 'प्रायव्हसी'चा आदर केला पाहिजे : मोहन भागवत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी समलैंगिक समुदायाबद्दल एक मोठे विधान केले आहे. ‘एलजीबीटी’ समुदायाच्‍या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्यक्त केले आहे.

सरसंघचालक भागवत (Mohan Bhagwat) यांनी ‘आरएसएस’च्या  ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “मनुष्य अस्तित्त्वात असल्यापासून असे लोक  आहेत. ते नैसर्गिक आहे. त्यांना प्रायव्हसीचा अधिकार मिळावा, अशी आमची इच्छा आहे. कारण तेही या समाजाचा एक भाग आहे, असे आम्हाला वाटते. तृतीय श्रेणीतील लोक (ट्रान्सजेंडर) ही समस्या नाही. त्यांचा स्वतःचा पंथ आहे, त्यांच्या स्वतःच्या देवदेवता आहेत.  “

लोकसंख्या धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, वाढती लोकसंख्या हे एक ओझं आहे, तसेच उपयुक्तही आहे. लोकसंख्येसाठी दूरगामी आणि सखोल विचार करून धोरण तयार केले पाहिजे. हे धोरण सर्वांना सारखेच लागू व्हायला हवे, मात्र त्यासाठी सक्ती नसावी. तर प्रबोधन करणे गरजेचे आहे, असेही भागवत यांनी नमूद केले.

संघाने जाणीवपूर्वक सक्रीय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. परंतु राष्ट्रीय धोरणांशी, राष्ट्रीय हिताशी संबंधित असलेल्या आणि हिंदूंना प्रभावित करणाऱ्या राजकारणाशी जुळवून घेतले आहे, असेही भागवत या वेळी म्‍हणाले.

हेही वाचा : 

Back to top button