TET Exam Rules | टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक: बुरखा, दुपट्टा, ओढणीला बंदी नाही

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जूनरोजी शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा
Maharashtra TET Update
Maharashtra TET Update AI Photo
Published on
Updated on

Maharashtra TET Update

अलिबाग : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेदरम्यान महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्यास कोणतीही बंदी नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा सुरू असताना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य राहील, असेही परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वाढलेले गैरप्रकार, डमी उमेदवारांचा वापर आणि तांत्रिक माध्यमातून होणारी कॉपी लक्षात घेता, यंदा सर्व परीक्षा केंद्रांवर 'लाइव्ह सीसीटीव्ही' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

Maharashtra TET Update
TET Exam: तीन दशके सेवा करूनही पुन्हा पात्रता सिद्ध करण्याची वेळ; अनुभवी शिक्षकांवर टीईटीची सक्ती

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ. अनुराग बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी उमेदवाराची ओळख, बायोमेट्रिक पडताळणी तसेच सीसीटीव्ही निरीक्षणादरम्यान चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. यासाठी चेहरा झाकलेला नसावा, अशी अट घालण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्येही परीक्षेदरम्यान चेहरा झाकण्यास परवानगी नसते.

Maharashtra TET Update
TET Exam 2026: टीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत कानात बसविण्यात येणारे अतिसूक्ष्म ब्लूटूथ किंवा वाय-फाय इअरफोन वापरून कॉपी करण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच तोंड झाकलेले असल्यास उमेदवारांमधील संभाषण किंवा संशयास्पद हालचाली ओळखणे अवघड होते. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षेदरम्यान प्रत्येक उमेदवाराचा चेहरा, मान, तोंड आणि कान स्पष्टपणे दिसणे आवश्यक असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news