Sonam Wangchuk Protest: पोलादपूरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी आंदोलनाला प्रतिसाद

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले.
Sonam Wangchuk Protest
Sonam Wangchuk ProtestPudhari
Published on
Updated on

पोलादपूर: देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवत संशोधक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पोलादपूर येथे विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने स्वाक्षरी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

या आंदोलनाला विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले.

Sonam Wangchuk Protest
Ashadhi Ekadashi Flower Market: पंढरपुरात दरवळतोय हजारो टन फुलांचा सुगंध

यावेळी अखिलेश शिंदे, ओम महाडिक, गणेश जांभळेकर, वेदांत उत्तेकर, सिद्धेश जाधव, ओमकार मोहिरे, आगस्त्य आडे, अंशुल गोळे, सुमित जिमन यांच्यासह अनेक विद्यार्थी, युवक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी, "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आता जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल. शिक्षण व्यवस्था पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह होईपर्यंत विद्यार्थ्यांचा लढा सुरूच राहील," असा निर्धार व्यक्त केला.

Sonam Wangchuk Protest
Pregnant woman Death Case: गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील डॉ. भावना पगारे यांचे निलंबन रद्द; महासभेचा मोठा निर्णय

देशभरात शिक्षणातील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी विविध ठिकाणी आंदोलने होत असताना, पोलादपूरातील या स्वाक्षरी आंदोलनानेही विद्यार्थ्यांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news