Ashadhi Ekadashi Flower Market: पंढरपुरात दरवळतोय हजारो टन फुलांचा सुगंध

आषाढीत तुळस, शेवंतीच्या हाराला मागणी; लाखोंची होणार उलाढाल
Flower Market
Flower MarketPudhari
Published on
Updated on

स्वप्निल कुलकर्णी

मुंबई: आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या चार दिवसांवर आल्याने पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आषाढीसाठी पंढरपुरातील फुलांची बाजारपेठ सजली असून, हजारो टन फुलांची आवक होत आहे.

Flower Market
Devendra Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त आजपासून राज्यभरात ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

त्यामुळे पंढरी तुळस, फुलांच्या सुगंधाने दरवळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आषाढीच्या पाच दिवसांत हार, फुले विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे येथील हार-फुले विक्रेत्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

पंढरपुरात फुलांचा फार मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. या ठिकाणी निरनिराळ्या फुलांचा लिलाव होतो. आषाढी वारी काळात तुळशी हार, फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होते.

पंढरपुरातून मंगळवेढा, सांगोला, अकलूज, खर्डी, सोलापूर, इंदापूर, म्हसवड, दिघंची, आटपाडी, सातारा, मोहोळ, मोडनिंब या ठिकाणाहून व्यापाऱ्यांची फुलांना मागणी आहे. पंढरपुरात यासाठी फुलांच्या बाजारपेठेत लिलाव केले जातात. त्यानंतर छोटे-मोठे हार विक्रेते हार तयार करून त्याची विक्री करतात.

Flower Market
Pregnant woman Death Case: गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील डॉ. भावना पगारे यांचे निलंबन रद्द; महासभेचा मोठा निर्णय

भगवंताला हार गुंफण्याची तीन पिढ्यांची परंपरा

पंढरपुरातील देवमारे कुटुंब विठ्ठलास परिधान करण्यात येणारा तुळशीहार गुंफतात. विठ्ठलाच्या पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत विठ्ठलास दिवसातून किमान पाच वेळा तुळशीसह विविध फुलांचे हार परिधान केले जातात. मोगरा, अष्टर, निशिगंध, झेंडू, तुळस, केवडा अशा विविध फुलांचे सुबक असे हार बनवले जातात. हे हार बनवल्यानंतर हे हार मंदिरामध्ये विठ्ठलाच्या पूजेच्या अगोदर आणून देण्यात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news