Raigad Fort Deepotsav: पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी.., रायगडावर दीपोत्सव! ३५३ मशालींनी उजळला दुर्गराज

Diwali 2025: दुर्गराज रायगडावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेला 'शिवचैतन्य सोहळा' म्हणजेच दीपोत्सव उत्साहात संपन्न झाला.
Raigad Fort Deepotsav
Raigad Fort Deepotsavfile photo
Published on
Updated on

Raigad Fort Deepotsav

नाते : इलियास ढोकले

दुर्गराज रायगडावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेला 'शिवचैतन्य सोहळा' म्हणजेच दीपोत्सव उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड यांच्या वतीने हा भव्य सोहळा पार पडला. 'पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी' या भावनेतून साजरा करण्यात आलेल्या या अनोख्या दीपोत्सवामुळे संपूर्ण रायगड परिसर तेजाने उजळून निघाला. शिवराज्याभिषेक झालेल्या 353 वर्षा इतक्या मशाली प्रज्वलित करून हा सोहळा पार पाडण्यात आला.

Raigad Fort Deepotsav
Diwali 2025: दिवाळीच्या रात्री 'हे' उपाय आठवणीने करा; वर्षभर घरात धन-संपत्ती राहील!

रायगड किल्ल्याच्या प्रत्येक कड्यावर, तटांवर आणि पायऱ्यांवर शेकडो दिवे, मशालींचा प्रकाश लखलखत होता. या आल्हाददायक प्रकाशात किल्ल्याचा दरारा आणि वैभव पुन्हा एकदा जिवंत झाल होतं. राज्यभरातून हजारो शिवभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिरकाई देवी मंदिरापासून राजसदरेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम, पारंपारिक मर्दानी खेळ आणि जयजयकाराच्या घोषणांसह उत्साहात आणण्यात आली. पालखी आगमनानंतर राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. हजारो शिवभक्तांच्या घोषणांनी संपूर्ण गड दणाणून गेला.

या दीपोत्सवात अनेक शिवभक्त, महिलावर्ग, स्थानिक तरुण आणि रायगड परिसरातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 'राजाचा दीपोत्सव' म्हणून ओळख मिळवणारा हा कार्यक्रम आता राज्यभरातील शिवभक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. तथापि, या वेळी किल्ल्यावर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अंधार निर्माण झाला होता. त्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाने पुढील वेळी आवश्यक ती सोय करावी, अशी मागणी केली. रायगडावरील हा “शिवचैतन्य सोहळा” म्हणजे केवळ दीपोत्सव नव्हे, तर छत्रपतींच्या तेज, पराक्रम आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा एक सजीव उत्सव ठरला.

Raigad Fort Deepotsav
fishing season Diwali : मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा जाणार

आम्ही 2012 पासून किल्ले रायगडावरती शिवचैतन्य सोहळा साजरा करून पहिला दिवा राजाच्या चरणी या भावनेतून किल्ले रायगडावरती वसुबारसच्या दिनी साजरा करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरती दिवाळीमध्ये शासनातर्फे कोणत्याही प्रकारचं दिपोत्सव किंवा रोषणाई केली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून आम्ही मावळे एकत्र येऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो. शासनाने यापुढे याची दखल घेऊन शासनाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक सणाला किल्ले रायगडावरती रोषणाई तसेच उत्सव साजरे करावेत.

सुनील पवार (अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news