

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
दिवाळी हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला जावा यासाठी समस्त कोकण तयारीत आहे. कोकणात येणार पर्यटक दिवाळीची गुलाबी थंडी व ताजे मासे खाण्यासाठी येतो. मनसोक्त समुद्राच्या लाटांचा आनंद व शिवरायांचे जलदुर्ग पाहण्यासाठी येतो. समुद्रकिनारी असणारे हॉटेल व्यावसायिकांनी चांगली सेवा देऊन पर्यटकांना खुश होतील.
पर्यटकांची सगळ्यात आवडती गोस्ट म्हणजे ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबी, दिवाळीच्या सुटीत वर्ष भर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यासाठी मुरुड परिसरातील कोळीबांधव तयारीला लागलेत. मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. कोणताही वाईस वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात त्यामुळे सोडे खरेदी 25 लाखांची उलाढाल होते.
मुरुडच्या अर्थकारण या दिवाळी हंगामावर अवलंबून राहते. यावर्षी कोकणात व रायगडात पर्यटक मोट्या संख्येने येणार अडचण आहेत. सध्या मुरुडला कोळंबी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मुरुड राजपुरी, नांदगाव गावातील महिला विकत होऊन ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुकवण्याच्या कामात मग्न आहेत. सोडे बनवण्यास जागा कमी पडते, खपशी कोळंबी टेम्पोत भरून मुंबई पुणेकडे विकायला जात आहे.
सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील, अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रेमाने सुकवली व दिवाळीसाठी साठवली. पर्यटकांची चांगली साथ मिळाली तर कोळी आर्थिंक सक्षम होईल. कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे कि मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी कॉक्रीटचे ग्राउंड पाहिजे .जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो.
मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणार देखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. परंतु मुरुडकडे त्यादृष्टीने पहिले जात नाही. मच्छिमारांसाठी रायगडला कोणताही चांगला प्रकल्प आला नाही. येथील मच्छिमारांचे मासेमारीत कौशल्य बघता यथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणाऱ्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल यासाठी लकोप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
गेली 2 वर्षे मच्छिमारांच्या व्यवसाय पूर्णतः कमी झाला होता. यावर्षी मासळी मिळाली पण पूर्वीसारखी नाही पण कोळी बांधव समाधानी आहे. पूर्वी दिवाळी हंगामात 50 लाखांहून अधिक उलाढाल होत असते. आता पर्यटक संख्या कमी झाल्याने अजूनही मंदीची लाट आहे. सरकारने कोळी बांधवाच्या सवलती बंद केल्याने अनेक कोळी कुटुंब खचलीत व मासेमारी सोडून इतर कामधंदे करत आहेत. याकडे कोणीतरी लक्ष देण्याची गरज आहे.
मनोहर बैले, मच्छिमार