Roha Stray Cattle Crop Damage: मोकाट गुरांमुळे देवकान्हे परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त; मालकांनी बंदोबस्त करा अन्यथा...

संतप्त शेतकऱ्यांचा अखेरचा इशारा
Roha Stray Cattle Crop Damage
Roha Stray Cattle Crop DamagePudhari
Published on
Updated on

श्याम लोखंडे

खांब: रोहा तालुक्यातील तसेच देवकान्हे परिसरातील शेतकरी मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीला आले आहेत.तोंडांत पडलेले कडधान्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले तर बाहे येथे शेतकऱ्यांचे भाजी पाल्याचे नुकसान करत आहेत.

अनेक वर्षानंतर सध्या यावर्षी उजवा तीर कालव्याला पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्याने भात लागवड केली असल्याने ते देखील पीक फुलून आल्याने या धानाचे देखील या मोकाट उन्नाड गुरांकडून नासधूस करून नुकसान करत असल्याने येथील शेतकरी बळीराजा आता अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

Roha Stray Cattle Crop Damage
Mumbai slum infrastructure: कोळीवाडा गावठाणांमध्ये मूलभूत सुविधा पुरवणार! चालू आर्थिक वर्षात कामांचा शुभारंभ

मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी एकटवणार असून ज्यांची गुरे असतील त्यांनी वेळीच आवर घाला अन्यथा ती सदरील खात्याच्या परवानगनिशी पकडून गो शाळेत पाठवण्यात येतील असा अंतिम आवाहन या विभागातील शेतकरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. खांब देवकान्हे विभागातील तळवली,चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, बाहे आदी ठिकाणी मोकाट गुरे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी संतापले आहेत.

तर त्यांचा बंदोबस्तासाठी या आदी देखील सोशल मीडिया आणि वृत्त पत्रांच्या माध्यमातून सदरील मालकांसाठी आवाहन करण्यात आले होते तसेच सदरील खात्याला या बाबतचे उपाय योजना संदर्भात निवेदन देखील देण्यात आले असून यासाठी पुन्हा एकदा येथील शेतकरी वर्ग एकत्रित येऊन यावर उपाययोजना करण्यासाठी चिल्हे येथे सभा घेण्यात आली होती.

Roha Stray Cattle Crop Damage
Raigad Fort: रायगडावर चाललंय काय? शिवसमाधी स्थळी 'प्री-वेडिंग शूट' केल्याचा व्हिडिओ व्हायरल

तर सदरच्या आयोजित सभेत पुन्हा एकदा मालकांनी माणुसकीचा हात देत आपापल्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आवाहन केले आहे अन्यथा आता अंत पाहू नका सदरील खात्याच्या परवानगनिशी पकडून गो शाळेत पाठवण्यात येतील असे सर्वानुमते ठरवितात आले आहे.

मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या सभेत रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदी निवडून आलेले सदस्य यांचे अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आले तसेच तालुक्यातील नेते तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य मधुकर शेठ पाटील यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी तसेच बांधकाम व आरोग्य सभापती नियुक्ती, त्याच बरोबर सौ निधी नरेंद्र जाधव यांची शिक्षण आणि महिला व बालकल्याण सभापती नियुक्ती करण्यात आली तसेच रोहा तालुका पंचायत समिती सभापती विजया विनोद पाशिलकर आणि संजय मांडुळस्कर यांची उपसभापती पदी निवड झाल्याने या सर्व कार्यसम्राट आणि कर्तबगार लोकप्रतिनिधी यांचे सर्वानुमते अभिनंदन ठरावा घेत शुभेच्छांचा वर्षाव उपस्थित सभेत एकच टाळ्यांचा कडकडाटाने केला.

यावेळी प्रगतशील शेतकरी तथा तळवली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे,देवकान्हे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळा भोईर,तळवली ग्राम पंचायत सरपंच रवींद्र मरवडे, रामचंद्र बामणे, किशोर भोईर, डॉ.श्याम लोखंडे, संतोष भोईर, पांडुरंग गोसावी,तळवली येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. एस पी जाधव, परिसरातील शेतकरी राम महाडिक, राम लोखंडे, राम शेलार,संदीप लोखंडे, सुरेश महाडिक, ठमाजी महाडिक,संदेश लोखंडे, पोलिस पाटील गणेश महाडिक, महेश मरवडे,किशोर कान्हेकर, गजानन जंगम, अनिल खांडेकर, मंगेश लोखंडे,कल्पेश महाडिकसह तळवलीतर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे,बाहे येथील युवा शेतकऱ्यांसह जाणते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

रेस्कु करून गो शाळेत धाडण्यातयेतील

मोकाट गुरांना पायबंदी घालण्यासाठी येथील शेतकरी गप्प बसणार नाही तर सदरच्या आयोजित सभेत सर्वानुमते ठरवितात आले आहे की वरील सुटलेले ही मोकाट आणि उन्नाड गुरे कोणी कोणी मालकांची असल्यास येत्या तीन चार दिवसांत त्यांना दावणीला बांधून घ्यावे असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.अन्यथा सदरील खात्याला निवेदन देण्यात आल्या प्रमाणे त्यांना रेस्कु करून गो शाळेत धाडण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरवितात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news