Raigad Fort: रायगडावर चाललंय काय? शिवसमाधी स्थळी 'प्री-वेडिंग शूट' केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Raigad Fort pre wedding shoot viral video: किल्ले रायगडावरील श्रद्धास्थान असलेल्या शिवसमाधी परिसरात एका जोडप्याने प्रि-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Raigad Fort pre wedding shoot viral video
Raigad Fort pre wedding shoot viral videofile photo
Published on
Updated on

Raigad Fort pre wedding shoot viral video

नाते: इलियास ढोकले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींनी बहरलेला किल्ले रायगड पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. किल्ले रायगडावरील श्रद्धास्थान असलेल्या शिवसमाधी परिसरात एका जोडप्याने प्रि-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित जोडपे शिवसमाधी परिसरात चित्रिकरण करताना दिसत असून, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या स्थळाच्या पावित्र्याचा भंग झाल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. शिवभक्तांच्या भावना दुखावणारे हे कृत्य असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Raigad Fort pre wedding shoot viral video
Krishna Patil ShivBhakt Raigad: गेल्या २६ वर्षांत १,२६३ वेळा रायगड पायी चढून ४६,१०० जणांना घडवले दर्शन

'किल्ले रायगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अशा पवित्र स्थळी मनोरंजनाच्या नावाखाली प्रि-वेडिंग शूट करणे अत्यंत अयोग्य आहे,' अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर किल्ले रायगडावरील संवेदनशील भागांमध्ये अशा प्रकारच्या शूटिंगवर बंदी घालावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

केंद्रिय पुरातत्व विभाग आणि संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधीत व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट नियमावली लागू करावी, अशी मागणी होत आहे. सोशल मीडियावर 'रायगडाची पवित्रता जपा' अशा हॅशटॅगद्वारे अनेक शिवप्रेमींनी आपला निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओची सत्यता आणि शूटसाठी परवानगी घेण्यात आली होती का? याची चौकशी प्रशासनाकडून होणे अपेक्षित असून, या प्रकरणावर आता पुरातत्व विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या गडकिल्ल्यांवर अशा पद्धतीने केले जाणारे प्री-वेडिंग फोटोशूटवर शासनाने तत्काळ बंदी आणावी. शिवसमाधीस्थळी करण्यात आलेले अशा पद्धतीचे कृत्य निषेधार्थ आहे.

शुभम कनोजे, द.रायगड सचिव, युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष

Raigad Fort pre wedding shoot viral video
Raigad News | रोहा तालुक्यात पहूर वाळंजवाडी गोमाशी डोंगरावर सापडले ऐतिहासिक अवशेष, तालुक्यातील पाचवा किल्ला म्हणून नोंद कराः शिवप्रेमींची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news