Raigad Zilla Parishad election: रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सूचना; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी
Raigad Zilla Parishad election
Raigad Zilla Parishad electionPudhari
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये महाड, कर्जत, रोहा येथे राजकीय वादाची ठिणगी पडली. यातून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस विभागाला सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Raigad Zilla Parishad election
Mahad Murder Case Verdict: बांधकाम ठेकेदाराच्या खूनप्रकरणी कामगारास जन्मठेप

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका करिता सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून रायगड जिल्ह्यात 59 गट, 118 गण असून 2 हजार 323 मतदान केंद्रांवर गुरुवार, 5 फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकांसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकारी व 15 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 1जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आह. 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल होणार आहत. 27 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मतदानाच्या अंतिम वेळेच्या चोवीस तास आधी निवडणूक प्रचार संपणार आहे. 5 फेब्रुवारी मतदान तर 7 फेब्रुवारी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरु होईल.

Raigad Zilla Parishad election
Panvel Project Affected: दि. बा. पाटील जयंतीदिनी करंजाडेत प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये हाणामारी

जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा सहा लाख तर पंचायत समिती निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना साडेचार लाखांची मर्यादा आहे. यावेळी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यावेळी नगरपालिका क्षेत्रात निवडणुका नसल्या तरी येथील राजकीय कार्यक्रमांचा लगतच्या भागावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जिल्हयात आचारसंहिता असून मतमोजणीपर्यंत ही आजारसंहिता लागू राहिल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.

Raigad Zilla Parishad election
Vadodara Mumbai Expressway: बडोदा–मुंबई द्रुतगती महामार्गामुळे माथेरान पर्यटनाला नवे बळ

रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज आहे. आदर्श आचारसंहितेची अमलबजावणी करण्यासाठीसाठी सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. सभा, मिरवणुकानिमित्त एकमेकांच्या आमनेसामने येऊन वाद विवाह होऊ नये. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आपल्या जिल्हयात नगरपालिका निवडणुकांवेळी जे झाले तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या काळामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही प्रतिबंधात्मक ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात त्या करण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नामनिर्देशनपत्रे पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. प्रत्येक मतदारास 2 मते देण्याचा अधिकार राहील पहिले मतद जिल्हा परिषद सदस्यासाठी व दुसरे पंचायत समिती सदस्यासाठी. रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 323 मतदान केंद्र आहेत. सर्व तालुक्यात पिंक मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, रॅम्प आदी सुविधा उपलब्ध असतील.

Raigad Zilla Parishad election
Panvel Municipal Election Polling: पहिल्या दोन तासांत मतदानाचा टक्का कमी, कामोठ्यात ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय

जात वैधता प्रमाणपत्र

राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, जात वैधता समितीकडे प्रस्ताव केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा कोणताही पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची उमेदवारास मुभा असेल.

सध्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांतून राजकीय पक्ष मतदारांना विविध वस्तु वाटप करून प्रभावीत करण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हयात होणाऱ्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांतून राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार केला जात आहे का, यावर लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

Raigad Zilla Parishad election
Raigad News : महाड वनविभागाची मोठी कारवाई! गुजरातहून चिपळूणला जाणारा 'खैरा'चा ट्रक जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा, मिरवणुकानिमित्त वेगवेगळे गट एकमेकांच्या आमनेसामने येऊन वाद विवाह होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आपल्या जिल्हयात नगरपालिका निवडणुकांवेळी जे झाले तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या काळामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही प्रतिबंधात्मक ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात त्या करण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.

किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news