रायगड : पोलिसांच्या प्रसंग सावधानतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न फसला!

रायगड
रायगड

माणगाव (रायगड) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत रेल्वे ट्रकवर आत्महत्या करण्यास गेलेल्या तरुणाचे प्राण माणगाव पोलिसांनी तत्परता दाखवून वाचविल्याची घटना ताजी असतानाच केवळ २ दिवसांच्या अंतरात तालुक्यात अशाच प्रकारची दुसरी घटना घडली आहे. कोस्ते आदिवासी वाडीतील तरुण  विजेच्या टाॅवरवर चढून आत्महत्या करीत असतानाच पोलिसांनी तत्परता दाखवून या तरुणाचेही प्राण वाचवल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दि. ४ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या  सुमारास माणगाव पोलीस ठाणे हद्दीत कोस्ते आदिवासी वाडी येथील तरुण अनिल गोपाळ जाधव (वय २३) हा आपली बायको सोबत नांदण्यास येत नाही म्हणून तेथे असणारे उच्च दाब विद्युत टॉवरवर आत्महत्या करणासाठी चढला आहे, अशी माहिती माणगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस ठाण्याचे सपोनि नवनाथ लाहंगे, सपोनि सतीश आस्वर, पोलिस हवलदार श्री. तुणतुणे, पोलीस नाईक श्री. खिरीट, पोलीस शिपाई श्री. तांदळे, पोलीस शिपाई श्री. डोईफोडे, पोलीस शिपाई श्री. शिंदे, पोलीस शिपाई श्री. सुरवसे यांनी त्वरीत घटना ठिकाणी धाव घेऊन त्यास विश्वास देऊन खाली उतरून आत्महतेपासून परावृत्त केले.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news