औरंगाबाद : आर्थिक व्यवहारातून एकाचे अपहरण; पोलिसांनी पाच तासात लावला छडा | पुढारी

औरंगाबाद : आर्थिक व्यवहारातून एकाचे अपहरण; पोलिसांनी पाच तासात लावला छडा

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पुर्ववैमनस्य व आर्थिक व्यवहारातून पतीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार कविता दिलीप चव्हाण (वय ३५, रा. बोकड जळगाव, ता. पैठण) या महिलेने पैठण पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाचे गांर्भिय ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपीला पाच तासात पुण्यातून अटक केले.

अधिक माहिती अशी, पैठण तालुक्यातील बोकड जळगाव येथील दिलीप चव्हाण (वय ४०) यांचा मागील भांडणाच्या व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दि.३ ऑगस्ट बुधवारी रोजी ४ वाजता पैठण येथील शेती जमीन रजिस्ट्री कार्यालयाच्या परिसरातून बळजबरीने दिलीप चव्हाण यांचे अपहरण करण्यात आले. चव्हणा यांना याला सिल्वर रंगाच्या कारमध्ये बळजबरीने टाकून कृष्णा तरमळे, दिनेश राठोड (दोघेही रा. बोकड जळगाव) व एक अज्ञात इसम यांनी अपहरण केले. याबाबत अपहरण झाल्याची तक्रार दिलीप चव्हाण यांच्या पत्नीने पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे दाखल केली.

जळगाव जिल्हा दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, पोना मनोज वैद्य, महेश माळी, गोपाल पाटील यांच्या पथकाने तपास सुरू करून व आरोपीच्या मोबाईल वरून पाच तासात पुण्यातून अपहरण कर्त्याची सुटका करून आरोपीला अटक करून पैठण येथे आणण्यात आले. दरम्यान मराठवाड्यातील बहुचर्चित ३०.३० आर्थिक घोटाळ्यातून सदरील अपहरण प्रकरण घडल्याची तालुका भर चर्चा होत असून. याबाबत मात्र तक्रारदार महिला व आरोपी तपास अधिकारी यांना आर्थिक व्यवहाराबाबत उडवा उडवीचे उत्तर देत आहे.

Back to top button