रायगड : कोकण रेल्वे ठप्प, आंबेवाडी नाक्यावर एसटीसाठी प्रवाशांची गर्दी

रायगड : कोकण रेल्वे ठप्प, आंबेवाडी नाक्यावर एसटीसाठी प्रवाशांची गर्दी


कोलाड: रेल्वेच्या कामामुळे शनिवारी रात्री ११ पासून मेगाब्लॉक करण्यात आला. तसेच पनवेल जवळ मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरल्याने कोलाड रेल्वे स्थानकात रेल्वे उभी करण्यात आली. तसेच अनेक रेल्वे स्थानकांत हिच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले.

मडगावकडून सुरतकडे जाणारी हॉलिडे एक्सप्रेस कोलाड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. ही गाडी सुटण्याची नियोजित वेळ माहित नसल्याने प्रवाशांनी आंबेवाडी एसटी स्टॅन्डकडे धाव घेतली. त्यामुळे आंबेवाडी नाक्यावर एसटी बस तसेच खासगी गाडीने जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मेगाब्लॉकमुळे जर प्रत्येक ठिकाणी रेल्वे उभ्या करायच्या होत्या, तर ज्या स्थानकातून गाडी पुढे सोडायची गरज काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गांतून व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news