रायगड : पेझारी येथे वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू | पुढारी

रायगड : पेझारी येथे वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू

रायगड: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. मेघगर्जनेसह वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू आहे. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील पेझारी दिवलांग गावातील बापलेक शेतातील तळ्यावर गेले होते. तिथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. रघुनाथ हिराजी म्हात्रे असे मृत वडिलांचे तर ऋषिकेश रघुनाथ म्हात्रे असे मृत मुलाचे नाव आहे.

दोघांना अत्यवस्थेत उपचारासाठी तत्काळ अलिबाग येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्या दोघांना मृत घोषीत करण्यात आले. बापलेकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button