महाड, पुढारी वृत्तसेवा: पनवेल -कल्याण रेल्वे मार्गावर मालवाहतुकीचे डबे घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आज (दि.१) महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशन येथे कोकण कन्या एक्सप्रेस व करंजाडी रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी ते सीएसटी या रेल्वे गाड्या सकाळी आठपासून थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे पॉन्ट्रीतील नाश्ता व जेवण संपल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता. प्लॅटफॉर्मवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी यांना समजल्यानंतर तातडीने त्यांनी स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, निवासी नायब तहसीलदार, आणि पोलिसांना पाणी, नाष्ट्याची सोय करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर रेल्वे स्टेशन येथे जाऊन त्यांनी प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट याची व्यवस्था केली.
तसेच ज्या प्रवाशांना स्वखर्चाने जायचे आहे, त्यांच्यासाठी महाड बस डेपोतून ६ बस उपलब्ध करून देण्यात आल्या. उर्वरित प्रवाशाकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली. याकामी जुबेर जलाल व जितेंद्र सावंत यांनी सहकार्य केले.
हेही वाचा