

पनवेल: तळोजा कारागृहतील कैद्यांना आत्ता 'हायटेक' सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आज (दि.४) तळोजा मध्यवर्ती कारागृहात बसवण्यात आलेल्या हायटेक सुविधांचे उद्घाटन अप्पर पोलिस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या हायटेक सुविधेमध्ये ई मुलाखत, ऑलन टेलिफोन सुविधा, किऑस मशीन सुविधाचा समावेश आहे. या हायटेक सुविधेमधील ऑलन फोनच्या माध्यमातून कैद्यांना आपल्या सहा नातेवाईकांना महिन्यातून १२ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Taloja jail
त्या सोबत ई मुलाखतीच्या माध्यमातून कुटुंबासोबत बोलता येणार आहे. त्या सोबत महिन्याची खाद्यपदार्थ खरेदी देखील ऑनलाइन करता येणार आहे. या सोबत न्यायालयीन तारखा, पॅरोलची माहिती कैद्यांना एका क्लिकवर मिळणार आहे. या सर्व सोयी सुविधा कैद्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेळी अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अभिजीत गुप्ता, अधीक्षक तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रमोद वाघ उपाधीक्षक महादेव पवार उपस्थित होते. Taloja jail
सन २००८ मध्ये सुरू झालेल्या तुरुंगात सध्याच्या घडीला २ हजार ९१९ पक्के कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांमध्ये इसिस संघटना, औरंगाबाद शस्त्र आरोपी, पुणे बॉम्ब ब्लास्ट, इंडियन मुजाहिद्दीन संघटना, १९९३ बॉम्बस्फोट मधील आरोपी तसेच गँगवर मधील आरोपींचा समावेश आहे. यासह इतर आरोपी या कारागृहात शिक्षा भोगत आहे. या कैद्यांना आता कारागृहाने उपलब्ध करून दिलेल्या हायटेक सुविधेचा वापर करता येणार आहे.
तंत्रज्ञानाद्वारे कैद्यांना न्यायालयाच्या तारखा आणि पॅरोल स्थिती यासारखी महत्त्वाची माहिती मिळणार आहे. या बायोमेट्रिक टचस्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेतया सुविधा उपलब्ध करून देणारे हे पहिले कारागृह असणार आहे.
कैद्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा पैकी, त्याच्या खाण्या पाण्यावर आमचे कारागृह विषेश लक्ष देऊन आहे. त्याच्या खाण्याचा दर्जा उंचावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खाण्याचा दर्जा उंचावल्यामुळे, त्यांची डाएट क्वॉलिटीदेखील सुधारणार आहे. त्यासोबत कारागृहाच्या पटांगणात आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
हेही वाचा