रायगड : साकव कोसळून 2 मुलांचा मृत्यू, दिघोडे-धुतूम खाडी किनार्‍यावरील घटना

मुलांचा मृत्यू
मुलांचा मृत्यू

उरण ः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीमधील मुले दिघोडे-धुतूम खाडी किनार्‍यावर मासे पकडण्यासाठी गेली होती. किनार्‍यावरील कमकूवत झालेला साकव अचानक कोसळून त्या खाली राजेश वाघमारे, अविनाश मुरकुटे या तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर गुरुनाथ कातकरी आणि सुरज वाघमारे या दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात तत्काळ हलवण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीतील चार तरूण हे नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी दिघोडे-धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनार्‍यावर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेली होती. त्यावेळी खाडी किनार्‍यावरील जूनी आणि कमकूवत झालेला कॉक्रिटचा साकव बांधबंदिस्ती अचानक फुटल्याने आलेल्या खाडीच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ही चार आदिवासी तरूण चिखलात रुतली गेली. राजेश वाघमारे, अविनाश मुरकुटे या तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर गुरुनाथ कातकरी आणि सुरज वाघमारे या दोघे गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी झालेल्या या दोघांना तत्काळ नवी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, या दुदैवी अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी मुलांचे जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news