रायगडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारींची कामचुकार १४ मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई | पुढारी

रायगडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारींची कामचुकार १४ मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : शसकीय कामात कसूर करणे, तसेच शासकीय कार्यालयातील वारस नोंदी, नोंदणीकृत दस्तांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे व काम पूर्ण करण्यास चालढकल करणे, अशा  १४ मंडळ कामचुकार मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई रायगड  निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केली आहे. या कारवाई मध्ये पनवेल तहसिल कार्यकायातील पोयंजे विभागातील मंडळ अधिकारी मनोज मोरे यांचा देखील समावेश आहे.

महसूल व वनविभागातील शासन परिपत्रका नुसार, ई फेरफार प्रणालीमध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोणतीही नोंद एक महिन्यापेक्षा जास्त तसेच विवादग्रस्त नोंद तीन महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन विहित कालमर्यादेत गुणवत्तापूर्वक कामकाज करण्याच्या सूचना व तसे निर्देश देण्यात आले आहे.  हे निर्देश देऊन देखील कामकाजामध्ये कसुरपणा करणे तसेच कामकाजामध्ये विलंब करणाऱ्या १४ कामचुकार मंडळ अधिकाऱ्यावर कायद्याच्या बडगा उचलून निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी कारवाई करत या सर्व अधिकाऱ्याच्या बदल्या त्याची सेवा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय अभिलेख कक्षात एक आठवड्यासाठी करण्यात आली आहे.

या मंडळ अधिकऱ्यामध्ये पनवेल तहसिल कार्यालयाच्या हद्दीतील पोयंजे विभागाचे मंडळ अधिकारी मनोज मोरे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यांची एक आठवड्यासाठी बदली जिल्हाधिकारी कार्यालय अभिलेख कक्षात  करण्यात आली आहे. मोरे यांच्यावर, उचित कालावधीत वारसनोंदणी न करणे, नोंदणीकृत दस्तांची नोंदी न करणे तसेंच कामकाजात टाळाटाळ करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. मोरे यांच्याकडे कर्नाळा मंडळ विभाग तसेच पोयंजे मंडळाचा अतिरिक्त कार्यभार होता, या दोन्ही मंडळ विभागात त्यांनी वारसनोदी ६ क ची प्रकरणे मजूर केली नाही, त्या मुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कामचुकार शसकीय अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाई मुळे शसकीय अधिकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button