रायगड : ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पनवेलमधून अटक | पुढारी

रायगड : ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पनवेलमधून अटक

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल शहरात ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल पथकाने अटक करून जवळपास ८ लाखांचे ड्रग्स जप्त केले. या मधील एक विद्यार्थी हा उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हे दोन्ही तरुण पनवेल शहरातील टपाल नाका आणि फॉरेस्ट कॉलनी परिसरातील रहिवाशी आहे.

ओंकार संजय खुटले (वय २३, रा. टपाल नाका, पनवेल) ललित सुनील पवार (वय २४, रा. बालाजी आंगण फॉरेस्ट कॉलनी पनवेल) अशी  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही ड्रग्स विक्रेत्या तरुणांना बुधवारी (दि. २९) नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल शहरातून अटक केली आहे.  ओंकार हा भाजी विक्रेता आहे. भाजी विक्रीच्या नावाखाली ओंकार चक्क ड्रग्सची विक्री करत होता. ड्रग्स मिळवून देण्यासाठी ओंकारला ललित मदत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पनवेल शहरातील हॉटेल सम्राट परिसरात काही अज्ञात व्यक्ती ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या पथकाने पनवेल शहरात सापळा रचला हा सापळा रचला. यावेळी एक व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. अमली पदार्था सारखे पदार्थ आढळून आले. हे ड्रग्स असल्याची खात्री झाली. यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल मध्ये राहणाऱ्या ललित सुनील पवार यांनी हे अमली पदार्थ दिल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर ललित पवार यालाही अटक केली.

या प्रकरणात ड्रग्स गोवामधून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने या दोन्ही आरोपींकडून जवळपास ७,९५,०००/- हजार रुपये इतक्या किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

शिक्षण घेत असताना ललित पवार बनला ड्रग्स विक्रेता

काही मित्र मंडळींच्या संगतीमुळे ललित पवार (वय २४ रा. पनवेल) शिक्षण घेत असताना पवारला नशेचा नाद लागला हा नाद पूर्ण करण्यासाठी,  पवार हा अंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने तो स्वतः ड्रग्स विकू लागला होता, ड्रग्स विकताना त्याने स्वतः आपले नशेचे व्यसन सुरू ठेवले होते. हे सर्व ड्रग्स त्यांना गोवा येथून येत असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत होते.

ड्रग्स विकण्यासाठी उच्चशिक्षीत विद्यार्थीची मदत

एलएसडी पेपरचा आंतरराष्ट्रीय दर 10,000 ते 15,000 दरम्यान आहे तर स्थानिक कमी दर्जाच्या औषधाची किंमत 3,000 ते 7,000 रुपये आहे.

Back to top button