

रोहे
महादेव सरसंबे : रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे कुंडलिका नदीला पूर आलेला आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका व अंबा नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर पाणी मध्ये झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील संपूर्ण नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कुंडलिका नदीला पाणी आल्यामुळे अष्टमी शहर व रोहा शहराच्या काही भागांमध्ये पाणी शिरल्याचे दृश्य आपणास पहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा अष्टमीतील नागरीकांची धाकधुक वाढली आहे.रात्र अष्टमी करांनी जागुन काढली आहे.रोहा नागोठणे, रोहा कोलाड मार्ग बंद असल्याने कामगारांचे हाल झाले असुन नुकसान सुध्दा झाले त्यांना पुरा मुळे कामावर जात नसल्यामुळे त्यांची रजा लागली आहे.
रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर मोठ्या मुलाच्या दोन्ही बाजूंनी पाणी असल्याने हा पुल सध्या रहदारीला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागोठणे, पाली, मुंबई, अलिबाग याकडे जाणाऱ्या प्रवासांचे हाल झाले आहे. संपूर्ण राजधानी बंद आहे, दुसरीकडे रोहा कोलाड मार्ग ही सध्या बंद आहे त्यामुळे रोहयातुन तळ कोकणात ही नागरिकांना जाता येत नाही.
रोहा शहरातील कुंडलिक नदीच्या काठावर असलेल्या नागरी वस्तीत पाणी शिरले आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या गावातही पाणी शिकायचे दृश्य पावस मिळत आहेत मध्यरात्रीपासून कुंडलिका नदीमध्ये पाणी वाढण्यास सुरुवात झाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे चित्र रोहा तालुक्यात दिसत आहे. रेस्क्यू टीम रात्रभर तालुक्यातील ठीक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.