Raigad Heavy Rain | महाड शहराच्या सुकट गल्लीमध्ये सावित्री नदीचे पाणी शिरले, रोह्यात मुसळधार पाऊस!

दस्तुरी नाका नाते खिंड पाण्याखाली!कुंडलिका व अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Raigad Heavy Rain महाड शहराच्या सुकट गल्लीमध्ये सावित्री नदीचे पाणी शिरले, रोह्यात मुसळधार पाऊस!
Raigad Heavy Rain महाड शहराच्या सुकट गल्लीमध्ये सावित्री नदीचे पाणी शिरले, रोह्यात मुसळधार पाऊस!
Published on
Updated on

महाड ,रोहे : मागील 48 तासात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आज पंधरा मिनिटांपूर्वी महाड शहराच्या सुकट गल्ली मधून महाड शहराच्या बाजारपेठेत प्रवेश केला असून पडणारा पाऊस लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान नातेखिंड येथे जाणारा दस्तुरी नाका हा सायंकाळी आठ नंतर पाण्याखाली आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार रानबाजीरे या पोलादपूर तालुक्यातील धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने पाणी पातळी वाढली असल्याची त्यांच्या नागरिकांमध्ये विविध स्तरांवर सुरू आहे. प्रशासनाची आपत्ती यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी देखील अत्यावश्यक असेल तरच रात्री घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे अर्ध्या तासापूर्वी शहरातील विद्युत पुरवठा बंद झाला आहे.

कुंडलिका व अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली,

सायंकाळी रोहा शहराहसह तालुक्यातील ग्रामीण भागात सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका व अंबा नदीने धोक्याची पातळी गाठली असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जोरदार पाऊस पडल्याने सातत्याने वीज खंडित होताना दिसत होती सायंकाळ नंतर वीज खंडित झाल्याने नागरिक हैरान झाले होते. आधीच पाऊस आणि त्यात काळोख अशी परिस्थिती रोह्यात होती

आपत्तीकालीन व्यवस्थापन सतर्क झाली असून त्यांनी अलर्ट होण्याचा आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहेत. डोलवहाल बंधाऱ्याची पाण्याची पातळी 24.40 मीटरवर पोहोचली असून ही धोका पातळी च्या (23.95m) वर आहे. तरी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना कळविण्यात येते की, धरणाच्या खालच्या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा तात्काळ देण्यात यावा, जेणेकरून आवश्यक ती खबरदारी घेता येईल. असा सूचना देण्यात आले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news