

रोहे, पुढारी वृत्तसेवा: दिवा स्टेशनच्या पश्चिमेला (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर (UP+DN) नुकतेच सुरू करण्यात आले आहे. पादचारी पुलाशी एस्केलेटर जोडले असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर (UP+DN) सुरू करून सार्वजनिक वापरासाठी खुले केले होते.
प्रवाशांना लेव्हल क्रॉसिंग गेट रोडच्या बाजूने प्लॅटफॉर्मवर प्रवेश बंद करून एस्केलेटर आणि पायऱ्यांद्वारे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास प्रवाशांना सोयीचे जावे याकरिता दिवा स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या मुंबई दिशेकडील टोकांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूचे एस्केलेटर सुरू करणे आणि लेवल क्रॉसिंग गेटजवळ मुंबईच्या टोकाला प्लॅटफॉर्मचे बॅरिकेडिंग केल्याने गेल्या काही दिवसांत एस्केलेटर आणि पायऱ्यांचा वापर वाढला आहे. ट्रॅकचे ट्रेसपासिंग लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
दिवा येथे ट्रॅक ट्रेस पासिंग कमी करण्यासाठी आणि पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूच्या एस्केलेटरच्या वाढत्या वापरासाठी प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेने आभार मानले आहेत. दिवा लेवल क्रॉसिंग गेटवर गाड्यांची अडवणूक सुधारण्यास मदत होत आहे. कारण रस्त्यावरील वाहनांसाठी लेवल क्रॉसिंग गेट उघडण्याचा वेळ कमी झाला आहे. ट्रेस पासिंग कमी झाल्यामुळे धावपळ होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे.
हेही वाचा