रायगड : गणेशोत्ससाठी रेल्वेच्या जादा गाड्या | पुढारी

रायगड : गणेशोत्ससाठी रेल्वेच्या जादा गाड्या

कमलेश ठाकूर

पेण :  महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश- त्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होत असून या सणासाठी ठाणा- मुंबई येथील सर्व चाकरमानी हे आपल्या कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी आतुर झालेले असतात. यानिमित्त रेल्वे, एसटी, लक्झरी व खाजगी वाहतूक अश्या मिळेल त्या वाहनांतून हे कोकणवासी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आपल्या गावाकडे गणपती सणासाठी १ आठवडाभर अगोदर निघून तयार असतात.

या वेळेस जे वाहन मिळेल त्या वाहनाने घरी जाण्याचा प्रयत्न करतात. कित्येक जण तर दोन-तीन महिने अगोदर रेल्वे, एसटी बसचे रिझर्व्हेशन करुन ठेवतात. तर काही तत्काळ तिकीट काढून गावाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अश्यांसाठी रेल्वे विभागाने खास गणपती सणासाठी सुपरफास्ट एक्सप्रेस शिवाय सर्व तालुका स्टेशनवर थांबणा-या रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात दिवा-चिपळूण ही १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर व २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अशी रेल्वे गाडी फक्त तत्काळ तिकीट सेवा (रिझर्व्हेशन नाही) या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही रेल्वे गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दररोज रिझर्व्हशन सुविधासहीत उपलब्ध करण्यात आली आहे. या शिवाय पनवेल- चिपळूण आणखी एक रेल्वे सेवा ४ सप्टेंबरपासून सुरु होत असून या तीन रेल्वे गाड्यांमुळे अगदी गणपतीच्या दिवसापर्यंत घरी जाण्याकरिता चाकरमान्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

पनवेल-चिपळूण ४ सप्टेंबरपासून

कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या रेल्वे प्रवासाचे तिकीट फक्त ५० रूपये पनवेल ते चिपळूण असे आहे. ही रेल्वे ४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत रोज धावणार आहे. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे. या गाडीचे आरक्षण होणार नसून प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग करावे लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रेल्वेचे वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी- १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दररोज रिझर्व्हशन सहीत (तत्काळ तिकीट).
सीएसटी- पहाटे १२.२०, दादर पहाटे . १२.३५, ठाणा- १.२३, पनवेल- २.१२, पेण- २.५२, रोहा ३.५०, माणगाव ४.१२, वीर – ४.२८, खेड- ५.२६, चिपळूण – ६.०२, सावर्डा – ६.२४ आरवली रोड – ६.३८, संगमेशवर – ७.०२, रत्नागिरी- ८.२०, आडवली- ९.०२, विलावडे- ९. २२, राजापूर रोड – ९.४४, वैभववाडी रोड – १०.०६, नांदगाव रोड- १०. ४६, कणकवली – ११.०४, सिंधुदुर्ग- ११.४२, कुडाळ- १२.०२, सावंतवाडी रोड- दुपारी २.२०.

दिवा-चिपळूण रेल्वेचे वेळापत्रक

दिवा-चिपळूण १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर व २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रिझर्व्हेशन नाही. दिवा जंक्शन सायं. ७.४५, पनवेल- सायं. ८. २५, पेण- ८.५३, रोहा – ९.५०, कोलाड- १०.०६, इंदापूर- १०.१८, माणगाव- १०.२२, गोरेगाव- १०.३८, वीर – १०.४७, सापे वामणे- ११, करंजळी- ११. ११, विन्हेरे – ११.२६. दिवाण ११.४१, खवटी- ११.५४, करंबणी बुद्रुक – पहाटे १२.०६, खेड, अंजणी – १२.२१, चिपळूण- पहाटे १.२५.

Back to top button