रायगड जिल्ह्यात ८, १९३ दहीहंड्या उभारणार | पुढारी

रायगड जिल्ह्यात ८, १९३ दहीहंड्या उभारणार

सुभाष म्हात्रे

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात गोपाळकाला सणानिमित्त ठिकठिकाणी आठ हजार १९३ ठिकाणी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्यात सार्वजनिक १,८६३ व खासगी ६,३३० दहीहंड्यांचा समावेश असून, त्याची तयारी आयोजकांकडून आतापासूनच सुरु झाली आहे.

श्रीकृष्ण जन्मानंतर गोपाळकाला सण ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी वेगवेगळ्या मंडळासह ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या वतीने सुरु झाली आहे. गोपाळकाळाच्या पार्श्वभूमीवर गावागावात सरावही सुरु झाले असून, त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी रायगड जिल्ह्यामध्ये ८ हजार १९३ ठिकाणी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्यात सार्वजनिक १,८६३ व खासगी ६,३३० दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात १७६ ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. काही ठिकाणी सकाळी, तर काही ठिकाणी दुपारी मिरवणुका काढून पारंपारिक पध्दतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी विविध सेलीब्रिटीना आणण्याचेही प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

Back to top button