Alibag raid gambling den : जुगाराचा अड्डा उघड; अलिबाग पोलिसांची धाड, देशी-विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त

Raigad crime : शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांच्या या कारवाईमुळे वचक निर्माण झाला आहे
 Gambling
GamblingPudhari
Published on
Updated on

अलिबाग : शहरातील कोळीवाडा परिसरात जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, अलिबाग पोलिसांनी सापळा रचून एका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम तसेच मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारू असा एकूण सुमारे २९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 Gambling
Raigad crime | CCTV फुटेजच्या आधारे चैनस्नॅचिंगचा छडा; एक आरोपी जेरबंद, सोन्याची साखळी, बाईक जप्त

याप्रकरणी नंदा सावंत (वय ५२, रा. कोळीवाडा, अलिबाग) याच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 'व्हाईट अँड गोल्ड ५५५ प्लेइंग कार्ड्स'चे १२ जोड आणि विविध प्रकारची देशी-विदेशी दारूचा समावेश आहे.

 Gambling
Raigad Crime : म्हसळ्यात २६ हजारांचा गुटख्याचा बेकायदा साठा जप्त

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांच्या या कारवाईमुळे वचक निर्माण झाला आहे.

 Gambling
Raigad Crime | खऱ्या सोन्याच्या आमिषाने दिली खोटी सोन्याची नाणी : पेण मधील एकाला 20 लाखांचा गंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news