Raigad Crime | खऱ्या सोन्याच्या आमिषाने दिली खोटी सोन्याची नाणी : पेण मधील एकाला 20 लाखांचा गंडा

कर्नाटक येथे बोलवून दिली खोटी सोन्याची नाणी दिली
Raigad Crime | खऱ्या सोन्याच्या आमिषाने  दिली खोटी सोन्याची नाणी : पेण मधील एकाला 20 लाखांचा गंडा
Published on
Updated on

पेण : खरे सोने देण्याचे आमिष दाखवून पेणमधील एका व्यक्तीची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे ते ३ जुलै या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी, रा. देवआळी, ता. पेण यांच्याशी आरोपी क्रमांक १ याने वारंवार मोबाईलवर संपर्क साधून खरे सोन्याची नाणी विकण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी आणि एका साक्षीदाराला हुबळी (कर्नाटक) येथे बोलावण्यात आले.

तेथे आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी साक्षीदारा समक्ष फिर्यादींकडून २० लाख रुपये स्वीकारले. त्याबदल्यात दिलेली सोन्याची नाणी खरी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, नंतर ती नाणी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ३१८ (४) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news