Raigad crime | CCTV फुटेजच्या आधारे चैनस्नॅचिंगचा छडा; एक आरोपी जेरबंद, सोन्याची साखळी, बाईक जप्त

नऊ दिवसांत गुन्ह्याची उकल; पंजाबमधील फरार आरोपी हरप्रीत सिंग उर्फ 'हॅप्पी'चा शोध सुरू
Raigad crime | CCTV फुटेजच्या आधारे चैनस्नॅचिंगचा छडा; एक आरोपी जेरबंद, सोन्याची साखळी, बाईक जप्त
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : शहरातील चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याचा अवघ्या नऊ दिवसांत छडा लावत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती पथकाने एक आरोपीला अटक केली. दरम्यान चोरीस गेलेली सोन्याची साखळी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली बाईक जप्त करण्यात आली आहे. तब्बल 300 ते 325 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 403/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4) व 3(5) अन्वये चैनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान 16 जून ते 25 जून 2026 या कालावधीत पनवेल शहरापासून उरण तालुक्यातील सोनारी गावापर्यंत विविध भागांतील सुमारे 300 ते 325 सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.

Raigad crime | CCTV फुटेजच्या आधारे चैनस्नॅचिंगचा छडा; एक आरोपी जेरबंद, सोन्याची साखळी, बाईक जप्त
Nanded Crime : धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून; 24 तासांत 5 आरोपी जेरबंद

या तपासाच्या आधारे पोलिसांनी विनय विपण कुमार (वय 27, मूळ रा. दल्ला पोस्ट काडियन, ता. बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब, सध्या रा. सोनारी, ता. उरण, जि. रायगड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चैनस्नॅचिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची साखळी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बाईक जप्त करण्यात आली.

Raigad crime | CCTV फुटेजच्या आधारे चैनस्नॅचिंगचा छडा; एक आरोपी जेरबंद, सोन्याची साखळी, बाईक जप्त
Pimpri Chain Snatching Arrest: पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईल पाठलाग; 15 लाखांचे दागिने चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्याला पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी हरप्रीत सिंग उर्फ 'हॅप्पी' (रा. पंजाब) हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाघ, पोलीस नाईक काळे आणि पोलीस शिपाई पाटील यांच्या तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली. 325 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून आरोपींपर्यंत पोहोचलेल्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news