Poladpur dumping ground protest : पोलादपूरमध्ये डम्पिंग ग्राऊंड विरोधात नागरिकांचा एल्गार

आमची माती आमची माणसं संघटनेचे अभिनव आंदोलन
Poladpur dumping ground protest
पोलादपूरमध्ये डम्पिंग ग्राऊंड विरोधात नागरिकांचा एल्गारpudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर शहर ः पोलादपूरच्या चोळई सावित्री नदी संगमावरील डम्पिंग ग्राऊंडविरोधात नागरिकांनीएल्गार पुकारला आहे. आमची माती आमची माणसं संघटनेने बुधवारपासून अभिनव आंदोलन सुरू केलेआहे.याचाचएक भाग म्हणून संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांच्यासोबत डम्पिंग ग्राऊंड येथेच आंदोलन करण्यात आले.यावेळी विरोधी गटनेते व नगरसेवकांचा सहभाग दिसून आला.

पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासिनता दाखविल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राऊंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गायी-गुरे ताव मारता असतात तर पावसाळयात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदुषित पाणीपुरवठा नळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात ठोस पाऊले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे.

Poladpur dumping ground protest
मनपाचा नाला बंदचा दावा फोल; हजारों माशांचा तडफडून मृत्यू

याविरोधात, संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेने शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले. मात्र, कचराप्रश्नी टोकाची भूमिका नको, अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करीत आहे, याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बुधवारी राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेने .शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंड वर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्याचे टाळून अलिप्त राहिले.

यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड आणि श्रावणी शहा तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मालुसरे व भाजपचे शहरप्रमुख महेश निकम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संघटनेसोबत सहभागी होऊन छ.शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंडवर स्थानापन्न न करता सर्वप्रकारच्या आंदोलनामध्ये जनतेसोबत असल्याचे सांगितले.

यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी 70-80 लाखांच्या निविदांद्वारे कचरा सफाईचे काम सुरू असून कचऱ्याची योग्यतऱ्हेने विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नगरसेविका श्रावणी शहा यांनी उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पावित्र्यच नष्ट करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

Poladpur dumping ground protest
नक्षलवादास पूर्णविराम

शिवसेनेचे विभागप्रमुख लक्ष्मण मोरे यांनी कचरा प्रश्नी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनामध्ये उद्याच विषय चर्चेला घेण्यात येईल, अशी माहिती दिली. राज पार्टे यांनी स्वत: कचऱ्याची घंटागाडी चालवित नगरपंचायत पोलादपूरच्या प्रांगणात आणली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी लवकरच कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राऊंड रानबाजिरे धरणालगतच्या मोकळया जमिनीवर उपलब्ध होण्यासाठी विनंती करण्यात आल्याचे सांगून केवळ जमिनीची निश्चिती करण्याची प्रकिया शिल्लक असल्याचे सांगीतले.

दरवर्षी 79 लाखांचा खर्च

दरवर्षी 79 लक्ष रूपयांची कचरा संकलन आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबध्द विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याने या कचराप्रवण क्षेत्रामध्ये चिकनसेंटरमधील जैवकचरा, शहरातील प्लास्टीक पिशव्या व बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील आणि हॉटेलव्यावसायिकांसह घराघरांतील ओला सुका कचरा याठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे. यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावरदेखील मोठया प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषणाची लक्षणं दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news