

Municipal Corporation's Claim of Closed Drain Proves False; Thousands of Fish Die
नांदेडः पुढारी वृत्तसेवा : ज्या नदीला आपण मजीवनवाहिनीफ मानतो, तीच गोदावरी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकून मृत्यूची नदी बनत आहे. महापालिकेकडून १४ नाले बंद केल्याचा दावा वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नदीपात्रात सांडपाणी मिसळणे सुरूच आहे. याचा भीषण परिणाम शुक्रवारी पहायला मिळाला, जेव्हा नदीतील प्रदूषणाचा स्तर वाढल्याने हजारों माशांचा तडफडून मृत्यू झाला.
नेमकी परिस्थिती काय? आहे हे गेल्या काही काळातील ही मासे मरण्याची तिसरी मोठी घटना आहे. तज्ज्ञांच्या मते, नदीच्या पाण्यात सांडपाणी थेट मिसळल्यामुळे पाण्याची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. जलचरांना जगण्यासाठी पाण्यात विर-घळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण किमान ८ टक्के असणे आवश्यक असते. मात्र, प्रदूषणामुळे हे प्रमाण घटल्याने माशांचा श्वास गुदमरला. पाण्यातील विरघळ लेल्या घन पदार्थांचे (टिडीएस) प्रमाण मानक मर्यादेपेक्षा दुपटीने वाढून ६०० च्या पार गेले आहे, जे अत्यंत घातक मानले जाते.
ही तर धोक्याची घंटा!
पर्यावरण अभ्यासक प्रा. उमाकांत जोशी यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ? केवळ नाले बंद केल्याचा दावा करून चालणार नाही, तर या मृत्यूचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. याच नदीतून शहराला पाणीपुरवठा होतो, त्यामुळे हे दूषित पाणी मानवी आरोग्यासाठीही मोठे संकट ठरू शकते. प्रशासनाने पाण्याचे नमुने तातडीने राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा.
खोटी माहिती देणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल
जिंतूर : कोणतीही मारामारीची घटना झालेली नसताना मुद्दामहून पोलिस प्रशासनाला दिशाभूल करणाऱ्या व ११२ वर चुकीची माहिती दिल्याबद्दल एका भामट्याच्या विर-ोधात पोलिसांनी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी (दि.२०) ८.२० वाजेच्या दरम्यान डायल ११२ वर कर्तव्य बजावत असताना ५.४५ वाजता शिवाजी मुक्ताजी मारकड रा. मोहाडी, ता. जिंतूर याने आपल्या मोबाईलवरून शासकीय तक्रार सुविधा डायल क्रमांक ११२ वर मारहाण झाल्याची कोणतीही घटना घडलेली नसताना पोलिसांना त्रास होईल या हेतूने कॉल करून खोटी माहिती दिली व स्वतःचा मोबाईल नंबर बंद ठेवला.
सदर कॉलरचा शोध घेऊन त्यास पोलिस ठाण्यात बोलावत घटनेबाबत माहिती विचारली असता त्यांनी अशी काही घटना घडली नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी खोटा कॉल केल्याचे मान्य केले. या प्रकरणी पोशि गव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायल ११२ हा क्रमांक गरजू लोकांना तत्काळ पोलिस मदत मिळावी याकरिता आहे. कोणीही पोलिसांना त्रास होईल यादृष्टीने खोटी माहिती दिली, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोनि सरोदे यांनी दिला आहे.
प्रशासकीय अनास्था की डोळेझाक
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या आदेशानंतरही शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रभावीपणे राबवले जात नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या याच दुर्लक्षामुळे गोदावरीचे पात्र आता मैलापाण्याने दूषित झाले असून, निसर्गाची ही हानी कधी भरून येणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.