Panvel Rickshaw Driver: पनवेलमध्ये रिक्षाचालकाचा महिलेवर चाकूहल्ला; 3.71 लाखांचा ऐवज लुटून फरार

रिक्षा बंद पडल्याचे सांगून सर्विस रोडवर थांबवली गाडी; गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल
Knife Attack
Knife AttackPudhari
Published on
Updated on

पनवेल : रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा चालकाने एका 36 वर्षीय महिलेवर चाकूने वार केल्याची घटना घडली. त्यानंतर रिक्षा चालकाने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी करून तो पळून गेला. या प्रकरणी रिक्षा चालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Knife Attack
Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू

संगीता भोईर या करंजाडे आर 3 येथे राहत असून त्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केटमधून घरी येण्यासाठी गणेश स्वीट, उरण नाका, पनवेल येथील रिक्षा स्टॉप येथे आल्या. यावेळी एका रिक्षात त्या बसल्या. करंजाडे आर थ्री च्या दिशेने जात असताना करंजाडे आर फोर मधील सत्य ट्रायडेंट बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडवरील नाल्याच्या ब्रिजवर आल्या असता रिक्षा चालकाने रिक्षा बंद पडली आहे

Knife Attack
Vijay Mallya High Court: भारतात परतण्याचा हेतू आहे की, नाही; आम्ही शेवटची संधी देतोय; विजय मल्ल्या यांना हायकोर्टाचा इशारा

असे सांगून तो रिक्षातून खाली उतरला आणि रिक्षाला पाठीमागून धक्का मारतो असे बोलून तो रिक्षाच्या पाठीमागे गेला आणि पाठीमागून येऊन हातातील चाकूने संगीता भोईर यांच्या गळ्यावर वार केला. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी संगीता भोईर रिक्षातून खाली उतरल्या आणि पळण्याचा प्रयत्न करू लागल्या.

Knife Attack
Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय : 304 परीक्षा कायमस्वरूपी बंद

यावेळी त्या रिक्षा चालकाने तिच्या छातीवर आणि पायावर चाकूने वार केले आणि गळ्यातील मंगळसूत्र, चैन, मोबाईल आणि पैशांची पर्स जबरदस्तीने काढून घेऊन चिंचपाडा करंजाडे ब्रिजच्या दिशेने पळून गेला. या हल्ल्यात संगीता भोईर गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षा चालकाने तीन लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news