Panvel News: गाडी बाजूला घेण्यावरून वाद अन् थेट मारहाण! १७ वर्षीय मुलावर हल्ला; बहिणीशीही गैरवर्तनाचा आरोप

भावाला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप
Panvel News
Panvel NewsPudhari
Published on: 
Updated on: 

विक्रम बाबर

पनवेल: नवीन पनवेलमधील सेक्टर ६ परिसरात गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी १७ वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

भावाला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या बहिणीलाही शिवीगाळ, धक्काबुक्की करून तिच्या अंगावरील कपडे व केस ओढून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शुभम (वय अंदाजे ३०) आणि यश (वय अंदाजे २७, दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Panvel News
Kandivali Gokul Nagar Slum: ‘घर तोडणार, मग एवढ्याशा घरात संसार कसा थाटायचा? ’गोकूळ नगरातील बाधित १४० कुटुंबांचा सवाल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल येथील रहिवासी १७ वर्षीय मुलगा त्याची २२ वर्षीय बहीण मृणयी हिच्यासोबत टाटा नेक्सॉन कारने सेक्टर ६ मधील बिकानेर स्वीटमार्टजवळ मिठाई आणण्यासाठी गेला होता.

बहिणीने कार रस्त्याच्या बाजूला उभी करून मिठाई आणण्यासाठी दुकानात गेली. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या मुलाला महिंद्रा थारमधून आलेल्या दोन तरुणांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

Panvel News
Instagram Extortion Case: इन्स्टाग्रामवर मैत्री, व्हिडिओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याकडे साडेतीन लाखांची मागणी

यावेळी मागील बाजूने जागा असल्याचे सांगितल्याने दोन्ही तरुण कारमधून उतरून त्याच्याशी वाद घालू लागले. त्यानंतर दोघांनी त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला खाली पाडून मारहाण करण्यात आली. त्यापैकी एका तरुणाने हातातील कड्याने त्याच्या तोंडावर व डोक्यावर मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.

भावाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली. त्यावेळी आरोपींनी तिलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच हातातील कड्याने तिच्या डोक्यावर मारहाण करून हात पकडून खेचले.

तिचे कपडे व केस ओढून छातीवर हाताने धक्का देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.घटनास्थळी उपस्थित काही नागरिक आरोपींना ‘शुभम, मारू नको’, ‘यश, मारू नको’ असे सांगत असल्याने त्यांची नावे समजल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news