Instagram Extortion Case: इन्स्टाग्रामवर मैत्री, व्हिडिओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याकडे साडेतीन लाखांची मागणी

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यापाऱ्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप; तिघांविरोधात गुन्हा दाखल.
Instagram Extortion Case
Instagram Extortion CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर व्यापाऱ्याकडे सेक्सटॉशन करून साडेतीन लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार यांचे इंस्टाग्रामवर एक खाते आहे. चार महिन्यापूर्वी त्यांना इंस्टाग्रामवर एका महिलेचा मेसेज आला होता. त्या मेसेजला रिप्लाय दिल्यानंतर ते दोघे एकमेकांशी संवाद साधत असायचे. संवाद सुरु असताना महिलेने त्यांना अन्य महिला खाते धारकाबाबत माहिती देत तिच्याशी बोलण्यास सांगितले.

Instagram Extortion Case
Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणीपुरवठा १६ तास बंद

मात्र तक्रारदार याने बोलण्यास नकार दिला. काही दिवसानंतर तक्रारदार याने त्या महिलेशी बोलण्यास होकार दिला. होकार दिल्यावर त्या महिलेच्या खात्यावरून तक्रारदारास मेसेज आला. त्यानंतर ते त्या महिलेशी चर्चा करत असायचे.

काही दिवसापूर्वी त्याना इंस्टाग्रामवर त्या खातेधारक महिलेचा व्हिडिओ कॉल आला. तो व्हिडिओ कॉल त्याने स्वीकारला. तेव्हा ती महिला नकोशा अवस्थेत होती. त्यानंतर तिने तक्रारदाराला अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. तक्रारदार हे दारूच्या नशेत असल्याने त्याने कपडे काढले.

Instagram Extortion Case
Mumbai Air Pollution: ऑक्टोबर हिटने मुंबईकर हैराण, त्यात धुळीची भर! धूळ रोखण्यासाठी कोट्यवधींचा पाण्याचा मारा

जून महिन्यात तक्रारदार हे दुकानात असताना एका नंबरवरून फोन आला. त्याने व्हिडिओबाबत सांगून साडेतीन लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. फोन करणारा व्यक्ती हा वारंवार पैशाची मागणी करू लागला. घडल्या प्रकरणी त्यांनी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news