Mhasla Wife Murder: म्हसळा तालुक्यात नवविवाहित पत्नीची दगडाने ठेचून हत्या; खाणीत काम करणारा पती अटकेत

दगडघूम येथील चिरा दगड खाणीत घडली धक्कादायक घटना; पत्नी जंगलात गेल्याचे सांगून आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Mhasla Wife Murder
Mhasla Wife MurderPudhari
Published on
Updated on

म्हसळा : कोकणात शिमगा अर्थात होळी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना, म्हसळा तालुक्यात हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील दगडघूम गावाच्या हद्दीत असलेल्या धेनू चव्हाण यांच्या चिरा दगड खाणीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या नवविवाहित पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mhasla Wife Murder
Khopoli Resort Theft Case: खोपोलीत रिसॉर्टमधील लॉकर फोडून 18.76 लाखांचे दागिने चोरी; तिघे आरोपी अटकेत

बीजापूर येथील मूळनिवासी असलेल्या सतीश चव्हाण आणि त्याची पत्नी निकिता यांचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ते दगडघूम येथील चिरा दगड खाणीत मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने सतीशने पत्नी निकिताला रागाच्या भरात खाणीशेजारील परिसरात नेले आणि तेथे डोक्यात लाकूड मारून

Mhasla Wife Murder
Matheran Illegal Construction: माथेरान स्टेशनसमोरील गटारावर अनधिकृत बांधकाम; नगरपरिषद प्रशासनावर विरोधकांचे प्रश्न

आणि तिच्या चेहऱ्यावर दगड घालून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नी निकिता कुठेतरी जंगलात निघून गेल्याचे खोटे सांगून त्याने खाण मालकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही बाब संशयास्पद वाटल्याने खाण मालकाने म्हसळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

Mhasla Wife Murder
Roha Gomashi Fort Discovery: रोहा तालुक्यातील गोमाशी डोंगरावर शिवकालीन अवशेष सापडले; ‘नव्या गड-किल्ल्याची’ शक्यता

पोलिसांनी सतीशची चौकशी केली असता,त्याने विसंगत उत्तरे दिल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. म्हसळा तालुक्यात आठ ते नऊ ठिकाणी जांभा दगड उतखणन सुरु असून या खाणींवर काही काही घटना घडत असतात त्यामुळे तेथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news