

रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील पूर्वीच्या काळातील ओळखला जाणारा तसेच केदार जननी मातेच्या पहाडी कड्यालागत असलेल्या गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना सापडल्या शिवकालीन ऐतिहासिक सापडले अवशेष त्यामुळे येथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याचे म्हटले जात आहे तर येथे हे शिवप्रेमी मागील दोन वर्ष या डोंगर परीसरात भटकंती आणि संवर्धन मोहिमेतून काम करतात या माध्यमातून या ठिकाणी त्यांना वरती काही ठिकाणी पाण्याचे टाकं तसेच गडाला असल्यासारखे तटबंदी जोथे ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत त्यामुळे या ऐतिहासिक डोंगराला ऐतिहासिक गडाचा दर्जा मिळावा अशी मागणी शिव प्रेमींच्या माध्यमातून पुरातत्व खाते आणि रायगड प्राधिकरण विभाकडे केली जात आहे.
रोहा तालुक्यामध्ये अवचित गड घोसाळेगड सुरगड आणि बिरवाडी( भवानी गड) गड असे चार किल्ल्यांची नोंद आहे, पण सह्याद्री मधले भटके आणि रायगड टूर गाईडचे सदस्य आनंद सोनाराम सानप,किशोर सावरकर ,कृष्णाराम जाधव ,केतन फुलपगारे,सौरभ घरट , दत्तात्रेय सावंत काका यांनी रोहा तालुक्यात इतिहासाच्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेले गडकोट किल्ले संवर्धन आणि त्याच्या संरक्षण मोहिमेच्या भटकंतीतून डोगर कड्यातून ऐतिहासिक ठेवेचा शोध घेत गेली अनेक वर्ष बा रायगड आणि दुर्ग गड संस्था यांच्या माध्यमातून तसेच शिवप्रेमी म्हणून हे ऐतिहासिक कार्य करत आहेत.याच अनुषंगाने तालुक्यातील पहूर वाळंजवाडी आणि सभोवतालचा प्रदेश हा ऐतिहासिक शिल्प वीरगळ सतिशीला यांनी समृद्ध आहे आणि त्याचेच संदर्भ घेऊन आनंद सानप यांनी भोवतालच्या परिसरात शोध मोहिमा केली. त्यांनी ही संकल्पना त्यांचे सहकारी कृष्णराम जाधव,किशोर सावरकर, सौरभ घरट , दत्तात्रेय सावंत काका, यांना दिली आणि इथून पुढच्या शोध मोहिमांना सहकार्य करण्याचे सहमती दर्शवली आणि त्याचे सार्थक झाले.शोध मोहीम दरम्यान वाळंजवाडी हद्दीत असणाऱ्या आणि पहूर कडील बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर त्यांना किल्ल्याचे असणारे काही अवशेष आढळून आले.
डोंगरावर आठ पाण्याचे टाक , कौलाची खापरे मटक्याची खापरे , तटबंदी दगडाचे चीरे , विटांचे अवशेष असे काही भरपूर सारे काही ऐतिहासिक काळातील अवशेष मिळाले आहेत.रोहा तालुक्यामध्ये चार गड किल्यांसोबतच या पाचव्या किल्ल्याची इतिहासात नोंद करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. वाळंजवाडी गावच्या हद्दीमध्ये असणारा आणि पहूर गावच्या वाटेवर असणारा या डोंगराला पूर्वी गोमाशीचे डोंगर असे नाव होते .रायगड टूर गाईडच्या सदस्यांनी गेल्या दोन वर्षात शोध मोहिमा घेतल्या पाण्याचे टाक मातीच्या मटक्याची खापरे चिरेबंदी जोथ्याचे अवशेष तसेच तटबंदीचे अवशेष असे भरपूर सारे ऐतिहासिक अवशेष मिळाले त्यावरून हा डोंगर नाही तर एक ऐतिहासिक किल्लाच आहे असा निश्चित निष्कर्ष या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
अनेक वर्षे गड संवर्धनाचे कार्य करत असताना या परिसरात सत्यशील विरगळ आढळून येत असल्याने गेली दोन वर्षे सातत्याने या डोंगरावर एक ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग गड असावे ही भावना मनात ठेवून आम्ही शोध मोहीम करत आहोत. ही मोहीम आजतागायत राबवत असताना या ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन अवशेष, त्यामध्ये पाण्याचे टाकं,तटबंदी असलेले कठडे, शिवकालीन चिरे,कौलांचे, मडक्यांची खापर, विटांचे अवशेष असे सापडत आहेत. त्यामुळे याला तालुक्यातील चार गडकिल्यांप्रमाणे गडकिल्याचा दर्जा मिळावा तसेच त्याची नोंद व्हावी या उद्देशाने इतिहास अभ्यासक यशवंत पुत्र मोहन फराटे हे पाहणी करणार असून तद्नंतर ऐतिहासिक किल्ला म्हणून याची पुरातत्व खात्याने आणि रायगड प्राधिकरण विभाकडे याला गड किल्ला म्हणून ओळखला जावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
शिवप्रेमी आनंद सोनाराम सानप पोलिस पाटील, कामथ-रोहा
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा तसेच इतिहासाची ओळख पुढच्या पिढीला निर्माण व्हावी तसेच पडक्या वस्तू दुरुस्त करणे, किल्ल्यांचे पावित्र्य राखणे यासारखे उपक्रम काही सामाजिक संस्था उपक्रम राबवत असतात त्यामध्ये अनेक दुर्गा प्रेमी शिवप्रेमी संस्था युवक असतात तसेच अनेक पिढी गड संवर्धन मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन इतिहासाचे जतन करण्याचे पवित्र कार्य करत असतात.अनेक किल्ल्यांच्या शोधात असतात या तरुणांना गड किल्ल्यांचे संवर्धन जतन या गोष्टींना शासकीय निधी देण्याची शासनाने तरतूद करण्याची मागणी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी केली आहे.