Matheran Illegal Construction: माथेरान स्टेशनसमोरील गटारावर अनधिकृत बांधकाम; नगरपरिषद प्रशासनावर विरोधकांचे प्रश्न

सैफउद्दिन मेमोरियल हॉल परिसरात अतिरिक्त कामाचा आरोप; नोटीस दिल्यानंतरही बांधकाम सुरू असल्याने कारवाईची मागणी
Matheran Illegal Construction
Matheran Illegal ConstructionPudhari
Published on
Updated on

नेरळ : माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या हद्दीतील माथेरान रल्वे स्टेशन समोरील नगरपरिषदेच्या गटारावर सध्या अनधिकृत बांधकाम सुरू आहे. याबाबत नगरपरिषदेतील विरोध पक्षाच्या नेत्यांनी हे बांधकाम थांबविण्याची मागणी केली आहे.

Matheran Illegal Construction
Roha Gomashi Fort Discovery: रोहा तालुक्यातील गोमाशी डोंगरावर शिवकालीन अवशेष सापडले; ‘नव्या गड-किल्ल्याची’ शक्यता

मात्र तक्रारीनंतर करण्यात आलेली कार्यवाही व आता प्रत्यक्षात दिवसढवळया नगरपरिषदेच्या गटारावर बेकायदेशीर बांधकाम चालू केले असल्याने, मात्र करण्यात आलेली कार्यवाही हा थातूर मातूर प्रकार आहे का? की या बकायदेशीर बांधकामाकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जात आहे का? असे प्रश्न मात्र विरोधी पक्षाचे गट नेते यांच्याकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहे.

Matheran Illegal Construction
Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी महायुतीचे अर्ज दाखल; ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळले

माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या हद्दीतील माथेरान रल्वे स्टेशन समोरील सैफउद्दिन मेमोरियल हॉल मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि मातीचे खोद काम चालू असून त्याबाबत मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी यांना याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार नगरपरिषदे मार्फत कार्यवाही देखील करण्यात आली. मात्र त्याच ठिकाणी प्रत्यक्षात नगरपरिषदेच्या गटारावर दिवसाढवळया बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तर बोहरी समाजाचे धर्मगुरू यांना अंधारात ठेवून वृक्षतोड, खोदकाम, अनधिकृत बांधकाम केले जात आहे, असा आरोप केला जात आहे. बावा साहेब (बोहरी धर्मगुरू) हे नेहमी माथेरानच्या निसर्गावर प्रेम करीत आले असून, माथेरानचे निसर्गसौंदर्य टिकवून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांनी माथेरान ला भेट दया असे त्यांच्या स्तरांवरून सांगण्यात येते.

Matheran Illegal Construction
Mumbai Vijaydurg Ro Ro Service: मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा : सहा तासांत कोकणात पोहोचण्याची सोय; पण दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

त्यांना पर्यावरण पूरक विकास हवा आहे. तर अशा अनधिकृत आणि नियमबाह्य कामांना नेहमी ते नेहमी विरोध करीत आलेले आहेत. काही लोक अनधिकृत कृत्य करीत असत्याचे मत हे सोशल मिडियाचे माध्यमातून विरोधीपक्षाचे गटनेते सिताराम कुंभार यांनी आपले मत व्यक्त करत, मागील काळात नमाज अदा करण्यासाठी म्हणून नगरपरिषदेच्या ताब्यातील माथेरान पर्यटन माहिती केंद्राचा एक गाळा आणि जकात / प्रवासी नाक्याचा असा एक गाळा असे एकूण दोन गाळे हे मेमोरियल हॉलच्या ताब्यात दिले होते. ते दोन्ही गाळे परत नगरपरिषदेने ताब्यात घेण्यासाठी आम्ही विरोधीपक्षाचे नगरसेवक म्हणून शंभर पाठपुरावा करणार असल्याचे ही मत व्यक्त केले. यात अधिकारी काहींची पाठराखण केल्यासारखी बाब समोर येत आहे. यात नगराध्यक्ष योग्य रित्या जबाबदारी पार पाडतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

Matheran Illegal Construction
Raigad Tanta Mukta Committee: शासकीय अनुदान बंद झाल्याने गाव तंटामुक्तीचे तीनतेरा

सदर बेकायदेशीर बांधकामावर करण्यात आलेली कार्यवाही हा थातूर मातूर कार्यवाहीचा प्रकार आहे का? की या बकायदेशीर बांधकामाकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जात आहे का? व या संदर्भात माथेरान आळीमिळी गुपचिळी का? असे प्रश्न मात्र विरोधी पक्षाचे गटनेते सीताराम कुंभार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तर विरोधी पक्षाचे गटनेते कुंभार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या माथेरानकरांमध्ये सुरू आहे. आता मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या भूमिकेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Matheran Illegal Construction
Uran CIDCO Land Fraud: मयत आत्याला ‘जिवंत’ दाखवून कोट्यवधींच्या भूखंडावर डल्ला; उरणमध्ये बनावट हक्कसोडपत्र प्रकरण उघड

सदर सैफउद्दिन मेमोरियल हॉलच्या दुरूस्ती कामासाठी नगरपरिषदेकडून दुरूस्ती परवानगी देण्यात आली आहे. मात्र ते अतिरिक्त काम करत असल्याचे, आमच्या निर्दशनास आले आहे. सदर परवानगी धारकास नगरपरिषदेकडून कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून, सोमवारपासून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल.

राहुल इंगळे, मुख्याधिकारी, माथेरान, गिरिस्थान नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news