Uran CIDCO Land Fraud: मयत आत्याला ‘जिवंत’ दाखवून कोट्यवधींच्या भूखंडावर डल्ला; उरणमध्ये बनावट हक्कसोडपत्र प्रकरण उघड

सिडकोच्या मोबदल्यातील जमीन हडपण्याचा कट; बनावट महिलेला रजिस्टर ऑफिसमध्ये उभे करून व्यवहार
Uran CIDCO Land Fraud
Uran CIDCO Land FraudPudhari
Published on
Updated on

जेएनपीए : सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी 12 वर्षांपूर्वी मयत झालेल्या आपल्या आत्तेला जिवंत भासवून, तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका बनावट महिलेला निबंधक कार्यालयात उभे करुन तिच्या नावाने हक्कसोडपत्र तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणात चौघांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Uran CIDCO Land Fraud
Iran US War : आखाती देशांमधील युद्धाचा रायगडला फटका! पोलादपूर-उरण-सुधागडचे 20 नागरिक अडकले

चिर्ले येथील तक्रारदार सुभाष नामदेव घरत (56) यांची आई लहानुबाई उर्फ बानुबाई यांचे 1 मार्च 2013 रोजी निधन झाले होते. सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला हजर होते. मात्र, आजोबा रामा गमा मढवी यांच्या नावे चिर्ले येथे असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून नातेवाईकांनीच कट रचला. ऑक्टोबर 2024 मध्ये आरोपी कृष्णा मढवी, मयूर मढवी आणि बाबू मढवी यांनी तक्रारदार सुभाष घरत यांची आई मयत झाली आहे हे माहिती असतानाही, केवळ नावातील साम्याचा फायदा घेत पनवेल तालुक्यातील डेरवली येथील एका अनोळखी महिलेला रजिस्टर ऑफिसमध्ये लहानुबाई म्हणून उभे केले.

Uran CIDCO Land Fraud
Raigad railway news | ४ महिन्यांत मोबाईल यूटीएस सहाय्यकांनी २.७० लाख प्रवाशांना ३.५४ कोटी रुपये किमतीची तिकीट विक्री

तसेच या डमी महिलेचे फोटो, सही आणि अंगठा वापरुन विनामोबदला हक्कसोडपत्र पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे या बनावट हक्कसोडपत्राच्या आधारे आरोपींनी 18 मार्च 2025 रोजी बांधकाम व्यवसायीक पार्थ गजोरा याच्या नावे जमिनीचे खरेदीखतही करुन घेतले. मूळ वारसदार सुभाष घरत यांना व इतर वारसदारांना कोणतीही कल्पना न देता हा सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुभाष घरत यांनी तलाठी कार्यालयात वारसदार असलेल्या आपल्या आईची माहिती घेतल्यानंतर तिच्या नावाने हक्कसोडपत्र घेण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता बनावट महिलेच्या माध्यमातून हा सर्व प्रकार केल्याचे उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा मढवी, मयूर मढवी, बाबुराव मढवी आणि सदर भुखंड खरेदी करणरा पार्थ गजोरा या चार जणांविरोधात फसवणूकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Uran CIDCO Land Fraud
Konkan Cashew Season Sale: कोकणात काजू हंगामाची धामधूम; खाडीपट्ट्यात रस्त्याकाठी आदिवासींच्या बियांना मोठी मागणी

सिडकोच्या संपादित जमिनीचा मोबदला

सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार उरणमध्ये घडला आहे. 12 वर्षांपूर्वी मयत झालेल्या आपल्या आत्तेला जिवंत भासवून, तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका बनावट महिलेला निबंधक कार्यालयात उभे करुन तिच्या नावाने हक्कसोडपत्र तयार करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने उरणमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news