Matheran Cleanliness Drive: माथेरानमध्ये ६५० श्रीसदस्यांची भव्य स्वच्छता मोहीम; पाच ते सहा टन कचऱ्याचे संकलन

नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त जंगल व शहर परिसर स्वच्छ; पर्यटनवाढीस चालना
Matheran Cleanliness Drive
Matheran Cleanliness DrivePudhari
Published on
Updated on

माथेरान : महाराष्ट्रभूषण थोर निरूपणकार तिथरूप आदरणीय श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 1 मार्च रोजी माथेरान शहरात श्रीसदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अत्यावश्यक अभियानासाठी माथेरान मधील श्रीसदस्यांसह कर्जत तालुक्यातील कडाव, नसरापूर, चिंचवली,मानिवली, भडवळ, डीकसळ,किरवली येथून जवळपास 650 श्रीसदस्य दाखल झाले होते. शहर चकाचक झाल्यानेआता पर्यटन वाढीलाही हातभार लागणार आहे.

Matheran Cleanliness Drive
Raigad Shimga Holi Festival: रायगडमध्ये ४,०८० होळ्यांची उभारणी; शिमगोत्सव-धुळवडीसाठी जिल्हा सज्ज

सकाळी आठ वाजता या अभियानास श्रीराम चौकातून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, गटनेते शिवाजी शिंदे,उप नगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सचिन दाभेकर, सिताराम कुंभार, किरण पेमारे,सुनील शिंदे,केतन रामाणे,गौरंग वाघेला,सोहेल महापुळे,किशोर मोरे,नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे,रिझवाना शेख, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे,अर्चना भिल्लारे, ऐश्वर्या शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Matheran Cleanliness Drive
Mangaon Shimga Festival: माणगावात शिमगोत्सवाची रंगत वाढली; लोककलांच्या खेळ्यांनी गावागावांत उत्साहाची उधळण

माथेरानच्या एकूण 52 किलोमीटर परिसरातील जंगल भागात सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्लास्टिक बाटल्या, वेफर्स ,गुटखा पाकिटे तसेच इतर प्लास्टिकजन्य सुका कचरा यावेळी श्रीसदस्यां कडून गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये सुध्दा काही भागातील लोकांची आजही स्वच्छते बाबतीत मानसिकता नसल्याने आजूबाजूला गटारात कचरा टाकला जातो तो सर्व गोळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील गटारे स्वच्छ करून पालापाचोळा,काचेच्या बाटल्या एकत्रित केल्या आहेत.मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाका, पार्किंग या भागात जवळपास 65 गोणी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.जमा करण्यात आलेला एकूण पाच ते सहा टन कचरा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांमार्फत हातगाडी मधून डंपिंग ग्राउंडवर नेण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

Matheran Cleanliness Drive
Mahad Khadipatta Water Crisis: महाड खाडीपट्ट्यात पाणीटंचाईचा कहर; शिमगोत्सवात गोमेंडीतील ग्रामस्थ पाण्याविना तहानलेले

या भव्य अभियानाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे श्रीसदस्य जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम कचरा नेहमीच पहावयास मिळतो. यातील नैसर्गिक कचरा हा झाडांचा पाला असून कृत्रीम कचरा प्लास्टिक बाटल्या,पिशव्या वगैरे असतो.यासाठी सर्वांनी संकल्प करून यापुढे कापडी पिशव्यांचा वापर केल्यास निश्चितच काहीअंशी का होईना प्लास्टिक मुक्त माथेरान होण्यास सुरुवात होईल.असे नगरसेविका रिझवाना शेख यांनी सांगीतले.

Matheran Cleanliness Drive
Konkan Shimga Festival: कोकणातील शिमगोत्सवाची रंगत; ग्रामदेवतेच्या पालखीतून परंपरा आणि भक्तीचा जल्लोष

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते.त्यामुळे याचा पर्यटन वाढीसाठी फायदा होत असून सर्वांची व्यवसाय वृद्धी होते.

मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

Matheran Cleanliness Drive
Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी 2013 चा भूसंपादन कायदा लागू करा; शेतकऱ्यांची सरकारकडे ठाम मागणी

वृक्षारोपण असो, स्वच्छता अभियान असो किंवा आरोग्य शिबीर असो धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवेळी श्रीसदस्य ही महत्वपूर्ण समाज प्रबोधनाची कार्ये यशस्वीपणे पार पाडत असतात.गावात अशाचप्रकारे कायमस्वरूपी स्वच्छता टिकविण्याची जबाबदारी नागरिक आणि आम्हा सर्व लोकप्रतिनिधी यांची आहे.नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी तसेच कंत्राटी कामगारांनी सुध्दा आत्मीयतेने आपले स्वच्छतेचे काम करणे गरजेचे आहे.

शिवाजी शिंदे, गटनेते माथेरान नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news