Mangaon Shimga Festival: माणगावात शिमगोत्सवाची रंगत वाढली; लोककलांच्या खेळ्यांनी गावागावांत उत्साहाची उधळण

पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि समाजजागृतीचे संदेश; मुंबईकर चाकरमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Mangaon Shimga Festival
Mangaon Shimga FestivalPudhari
Published on
Updated on

माणगाव: कोकणातील शिमगोत्सवाला यंदा उत्साहाची नवी उधळण लाभली असून गावोगावी लोककला सादर करणारे खेळे दाखल झाले आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी मिरवणुकीतून शिमगोत्सवाची रंगत अधिकच खुलते आहे.

Mangaon Shimga Festival
Mahad Khadipatta Water Crisis: महाड खाडीपट्ट्यात पाणीटंचाईचा कहर; शिमगोत्सवात गोमेंडीतील ग्रामस्थ पाण्याविना तहानलेले

मनोरंजनासोबतच संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या या लोककलेतून समाजजागृतीचे प्रभावी संदेश दिले जात आहेत. समूहनृत्य, पारंपरिक गाणी, विनोदी व सामाजिक आशयाच्या सादरीकरणांमुळे ग्रामस्थ मंत्रमुग्ध होत आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत तसेच महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

Mangaon Shimga Festival
Konkan Shimga Festival: कोकणातील शिमगोत्सवाची रंगत; ग्रामदेवतेच्या पालखीतून परंपरा आणि भक्तीचा जल्लोष

या खेळांमध्ये पारंपरिक वाद्यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळतो. ढोलकी, झांज, घुंगरू, काठ्या, तुणतुणे यांच्या तालावर कलाकार सादरीकरण करीत आहेत. ताल-लय-नृत्य यांचा सुंदर मिलाफ गावकुसात सांस्कृतिक जल्लोष निर्माण करीत आहे. विशेष म्हणजे मुंबईकर चाकरमानीही आपल्या गावाकडे परत येऊन या लोककलेत सहभागी होत आहेत. त्यामुळे गाव आणि शहर यांतील भावबंध अधिक दृढ होत आहेत.

Mangaon Shimga Festival
Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी 2013 चा भूसंपादन कायदा लागू करा; शेतकऱ्यांची सरकारकडे ठाम मागणी

मुंबईकर चाकरमानीही आपल्या गावाकडे परत येऊन या लोककलेत सहभागी होत आहेत. त्यामुळे गाव आणि शहर यांतील भावबंध अधिक दृढ होत आहेत. शिमगोत्सवाच्या निमित्ताने एकोप्याचा संदेश देत, संस्कृतीची परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचे कार्य या लोककलेतून होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news